पुणे सोलापूर हायवेवर कुरकुंभ औद्योगिक वसाहत लगत ज्वलनशील (स्फोटक) पदार्थ घेवुन निघालेला टॅंकर झाला पलटी


पुणे सोलापूर हायवेवर कुरकुंभ औद्योगिक वसाहत लगत ज्वलनशील (स्फोटक) पदार्थ घेवुन निघालेला टॅंकर झाला पलटी

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

पुणे सोलापूर हायवेवर कुरकुंभ औद्योगिक वसाहती लगत जे.एन.पी.टी मुंबई येथुन ज्वलनशील पदार्थ घेवुन निघालेला टॅंकर उलटला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या पाच क्रेन उपलब्ध झाले आहे.व वाहतूक पुर्ववत करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहेत.

दौंड पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या आदेशानुसार कुरकुभ पोलिस चौकीचे जमादार एस.एम.शिदे व अन्य पोलिस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तसेच भिगवण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दडस सह दौंड पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे.

मुख्य महामार्ग वरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवली असुन दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News