जालिंदर बोरुडे यांना आदर्श नेत्रदूत पुरस्कार गरजूंसाठी घेतलेल्या मोफत नेत्र शिबीराची दखल


जालिंदर बोरुडे यांना आदर्श नेत्रदूत पुरस्कार  गरजूंसाठी घेतलेल्या मोफत नेत्र शिबीराची दखल

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना नाशिक येथील बहुजन सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श नेत्रदूत पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सेवा संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे यांनी दिली.

बहुजन सेवा संघाच्या वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्था व व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून शिबीर घेऊन हजारो गोरगरीब वंचितांना रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणून त्यांना नवीन दृष्टी देण्याचे कार्य केले आहे. निस्वार्थ भावनेतून त्यांचे हे कार्य सुरु असून, कोरोनाच्या संकटकाळात देखील त्यांनी गरजू रुग्णांना शिबीराच्या माध्यमातून मोठा आधार दिला. तसेच नेत्रदान चळवळीत उत्कृष्ट कामगिरी करुन अनेकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित केले. तर त्यापैकी काहींनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प देखील पुर्ण केला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना आदर्श नेत्रदूत पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे कांबळे यांनी सांगितले

या पुरस्काराचे वितरण लवकरच नाशिक येथे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे बहुजन सेवा संघाचे सचिव प्रभाकर सोनवणे यांनी कळविले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News