बारामती शहरांमध्ये पोलीस बॉईज पदाधिकार्‍यांची नियुक्ती


बारामती शहरांमध्ये पोलीस बॉईज पदाधिकार्‍यांची नियुक्ती

बारामती : प्रतिनिधी काशिनाथ पिंगळे

बारामतीमध्ये पोलीस बॉईज असोशियन महाराष्ट्र राज्य तर्फे बारामती शहर आणि पदाधिकारी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. पोलिसांच्या कल्याणार्थ काम करण्याची तळमळ व मेहनत बघून बारामती पोलीस बॉईज असोशियन महाराष्ट्र राज्य तर्फे बारामती शहरात नुकतीच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातील पोलीस दलात कार्य करणाऱ्या व त्यांच्या कुटुंबांच्या संरक्षणार्थ काम करण्यासाठी या पोलीस बॉईजची नियुक्ती करण्यात आली आहे. 

यावेळी अमोल गायकवाड (बारामती शहर सचिव),  अमोल बिनवडे (शहर चिटणीस), शैलेश सोनवणे (शहर सरचिटणीस),  प्रतिक झगडे (शहर सदस्य),  तेजस सोनवणे (शहर सदस्य) यांची शहराध्यक्ष संजय दराडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली.

         यावेळी बारामती शहराध्यक्ष संजय दराडे,  कायदेशीर सल्लागार अँड. मेघराज  नालांदे, अॅड. ओकार इंगुले, सचिव किरण नवले, सरचिटणीस अनेकांत वनवे, दीपक केळकर व पत्रकार माधव झगडे, प्रीतम मेहेर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News