दौंड पाटस रस्त्यावर ट्रकला ओव्हरटेक करताना एसटीचा अपघात सर्व प्रवाशी सुरक्षित,विजेच्या खांबामुळे बस थांबली


दौंड पाटस रस्त्यावर ट्रकला ओव्हरटेक करताना एसटीचा अपघात सर्व प्रवाशी सुरक्षित,विजेच्या खांबामुळे बस थांबली

 विठ्ठल होले  विशेष प्रतिनिधी :

 दौंड पाटस रस्त्यावर गोरेमळा येथे ट्रकला ओव्हरटेक करताना जामखेड स्वारगेट बस ला अपघात झाला सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप आहेत,दौंड पाटस रस्त्याचे अष्टविनायक मार्ग म्हणून काम सुरू आहे एक बाजू पूर्ण होत आली आहे परंतू ठिकठिकाणी पुलाचे काम अर्धवट स्थितीत असून धिम्या गतीने काम होत आहे,चार दिवसापूर्वी पतीपत्नीचा अपघात झाला होता, त्यामध्ये महिला मृत्यू पावली होती,याला जबाबदार कोण?छोटे मोठे अपघात रोजच होत आहेत, माहिती फलक दिसत नाहीत,रस्त्याची एकच बाजू पूर्ण होत आहे,त्यामुळे आज सकाळी जामखेड हुन पुण्याकडे जाणारी एसटी समोर पुण्याकडेच जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करताना दौंड पाटस रस्त्यावर गोरेमळा येथे रस्त्याच्या खाली गेली,तेथील प्रत्यक्षदर्शी प्रशांत गोरे आणि त्यांचे सहकारी मदतीला धावून आले, बस मध्ये प्रवासी 50 ते 60 होते असे त्यांनी सांगितले,  बस विजेच्या खांबाला टेकल्या मुळे बस पलटी झाली नाही, आणि बस जर विजेच्या खांबाला धडकली असती तर मोठा अनर्थ घडला असता,परंतू सुदैवाने असे काही घडले नाही.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News