नगरपरिषदेच्या निष्क्रीय नियोजनामुळे कोपरगाव शहराचा विकास थांबला !!माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील


नगरपरिषदेच्या निष्क्रीय नियोजनामुळे कोपरगाव शहराचा विकास थांबला !!माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.                              कोपरगाव शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून सर्वत्र  धुळीचे मोठे साम्राज्य पसरल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाच्या व मूलभूत प्रश्नाकडे नगरपरिषद जातीने लक्ष का घालीत नाही असा सवाल माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ  असुन येथे शैक्षणिक हब मोठ्या प्रमाणात आहे परीषदेने च्या माध्यमातून या सुधारणा जर सातत्याने चालू ठेवल्या तर कोपरगाव हे मुख्यालय होऊ शकते .

नगरपालिकेने ठरवले तर एक महिन्याच्या आत रस्ते धूळ मुक्त होऊ शकतात असे हि ते यावेळी म्हणाले

 श्री पाटील पुढे म्हणाले कि आज शहरात कोणत्याही बाजूने प्रवेश केला असता प्रत्येक रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येते रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.धुळीमुळे डोळ्यांचे व श्वसनाचे विकार तसेच  खड्ड्यांमुळे दुचाकी चारचाकी वाहनांचे होणारे नुकसान व मणक्याचे आजार यामुळे जनता पुरती वैतागली आहे. नगरपरीषदेला विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असुन रस्त्यांच्या निविदा ही काढल्या आहेत मात्र निष्क्रिय नियोजनामुळे शहराचा विकास थांबला असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

 नगर परीषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे रस्त्याची कामे होण्यास तयार नाहीत रस्त्याच्या बाजूला महिनोन्महिने पडलेली खडीची विल्हेवाट न लावल्याने त्याचा त्रास विशेषता महीला,लहान मुले, वृद्धांना सहन करावा लागत आहे.

 नगराध्यक्ष सांगतात कि निविदा निघाल्या आहेत लवकरच कामाला सुरुवात होईल असे वारंवार सांगतात मग कामे का सुरू होत नाही असा सवाल करून प्रशासन व अधिकाऱ्यांत  ताळमेळ नसल्याने पैसे असतांना देखील रस्ते होत नाहीत.रस्ते जर चांगले झाले तर शहराचा कायापालट होऊन व्यापारवृद्धी निश्चितपणे होऊ शकेल मात्र नगरपालिका हे जाणून बुजून करत नसल्याचा आरोप पाटील यांनी करून रस्त्यावर टॅंकरद्वारे पाणी मारण्यात येते मात्र ती तात्पुरती मलमपट्टी असुन रस्त्यावर पाणी मारू नये असे आपले परखड मत असून दरवर्षी डांबरीकरण करून रस्ते तयार करावे असेही ते म्हणाले.

 यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे नद्या तुडुंब भरलेले आहेत असे असताना देखील नगरपालिका हिवाळ्यात ही शहराला सात दिवसाआड पाणीपुरवठा करत असताना नागरिकही का गप्प बसले आहेत ? नागरिकांना आरोग्य रस्ते व पाणी या आवश्यक बाबी असताना यावरच भर दिला जात नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल गोदावरी लहान पूल ओलांडला व मुख्य रस्त्यावरून थेट साईबाबा चौफुली पर्यंत जायचे झाले तरी मोठे स्पीड ब्रेकर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाहनांमुळे उडणारी धूळ असेच काहीसे चित्र निवारा रोड गांधिनगर बैल बाजार गुरुद्वारा रोड इंदिरा पथ धारणगाव रोड व इतर रस्तेही तूट फुट  झालेले आहेत त्यातच खाजगी दूरसंचार वाहिन्यांच्या खोदाईमुळे आहे ते रस्ते खराब होत आहेत या प्रश्नावर कोणीच बोलायला तयार नाही अथवा नगरपालिका प्रशासन त्याबाबत तातडीने पावले उचलण्यास धजत नाही सर्वसामान्य नागरिक घरपट्टी पाणीपट्टी शैक्षणिक तसेच झाडे लावण्या संदर्भात कररूपाने पैसा भरतो मात्र त्याचा विनियोग चांगला होत नसल्याचे दिसत आहे नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात मात्र रस्ते व इतर गल्लीबोळात झाल्यानंतर सदरची धूळ ही आजूबाजूला लावून देण्यात येते हीच धूळ दररोज उचलली लांब नेऊन टाकली तर धुळीच्या प्रमाणात बराचसा फरक पडू शकेल नगरपालिकेने नागरिकांच्या जीवाशी न खेळता तातडीने रस्त्याची कामे करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही श्री पाटील यांनी केली.

  मी काही महिने नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलो आहे त्यामुळे मला या सर्वसामान्य प्रश्नांची जाण आहे त्यामुळेच मी पालिका प्रशासनाला याप्रश्नी सातत्याने जबाबदार धरीत आहे सामाजिक दृष्टिकोन ठेवून कोणतेही राजकारण न करता मीही मागणी करीत आहे नेत्यांनी त्यांच्या परीने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचा विनियोग चांगली कामे करून दाखवण्यात घालवावा असा सल्लाही श्री पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला .                                       शहरातील धारणगाव रस्त्यावर डांबरीकरण करणे ऐवजी त्यावर मुरूम टाकणारी राज्यातील एकमेव नगरपालिका असल्याची टीका श्री पाटील यांनी करून त्यांच्या सुरू असलेल्या कारभारा चे चांगलेच वाभाडे काढल्याने शहरात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News