खोरवडी येथे काल झालेल्या खुनातील आरोपी 24 तासात अटक,दौंड पोलिसांची धडाकेबाज कारवाई


खोरवडी येथे काल झालेल्या खुनातील आरोपी 24 तासात अटक,दौंड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

 दौंड तालुक्यातील खोरवडी येथे किरकोळ कारणावरून दोघांनी एकाचा खून केला होता, आणि दोन्ही आरोपी फरार होते,दौंड पोलिसांच्या टीमने 24 तासाच्या आत एक आरोपी अटक करून कौतुकास पात्र झाले आहेत, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक सुरू असताना दौंड पोलिसांना वेगळेच काम लागले होते 15 जानेवारी रोजी खोरवडी येथील जपान कृष्णा चव्हाण वय 22 वर्ष राहणार खोरवडी याला गोरख आबा काळे व अक्षय गोरख काळे हे त्याला तू खोरवडी त राहू नको,तू भिगवण येथे तुझ्या सासुरवाडी ला रहायला जा असे म्हणून जपान चव्हाण यांचे बरोबर भांडण करून त्याचा खून केला अशी तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे,घटना गंभीर असल्यामुळे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटना स्थळी भेट देऊन आरोपी अटक करण्याचे आदेश दिले,त्यानुसार ASI दिलीप भाकरे,पो हवा पांडुरंग थोरात,असिफ शेख,पो नाईक सचिन बोराडे,किरण राऊत,पो कॉन्स्टेबल अमोल गवळी,अमोल देवकाते,अमजद शेख यांनी खबऱ्या मार्फत माहिती घेऊन आरोपी गोरख आबा काळे वय 48 राहणार खोरवडी याला खोरवडी येथून ताब्यात घेतले आहे,खुनातील आरोपी 24 तासात अटक केल्यामुळे संपुर्ण टीमचे कौतुक होत आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News