सावधान मिरवणूक,फटाके फोडण्यास मनाई मा जिल्हा अधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या निर्णयाचे जनतेतून स्वागत, मिरवणूक, गुलाल,फ्लेक्स बंदी,तर हॉटेल,ढाबे एक दिवस बंद


सावधान मिरवणूक,फटाके फोडण्यास मनाई मा जिल्हा अधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या निर्णयाचे जनतेतून स्वागत, मिरवणूक, गुलाल,फ्लेक्स बंदी,तर हॉटेल,ढाबे एक दिवस बंद

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

 पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक 15 जानेवारी रोजी पार पडली असून 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे,त्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार  घडू नये यासाठी पुणे जिल्हा अधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत त्याचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे.सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी ग्रामपंचायत 2021 ते 2025 या कालावधी साठी गावकारभरी ठरणार आहेत, यावेळी मतमोजणी शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व मतमोजणी नंतर पुणे जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत,विजयी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते जोश मध्ये मिरवणूक काढून फटाके वाजवून,गुलालाची उधळण केली जाते, त्यातून पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके वाजवले जातात त्यामुळे दोन गटामध्ये,जाती जाती मध्ये, धर्मामध्ये,भावकीत वाद निर्माण होतात,असे अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना कडक निर्बंध करण्याविषयी कळविले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच गुलाल उधळणे,फलक,बॅनर लावण्यास व फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे, हे 18 तारखेच्या मध्यरात्री पासून पुढील 24 तासांसाठी हे निर्बंध लागू असल्याचे सांगण्यात आले आहे,त्याचे उल्लंघन झाल्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत,तसेच ग्रामीण भागातील हॉटेल,ढाबे,पानटपरी इत्यादी 18/1/2021 रोजी रात्री 10 वाजलेपासून ते 19/1/2021 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहतील,असे आदेश देण्यात आले आहेत,या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा द वि संहिता कलम 188 मधील तरतुदी व प्रचलित कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहतील,या निर्णयाचे जनतेतून स्वागत होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News