विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
दौंड तालुक्यातील 49 ग्रामपंचायत साठी मतदान प्रक्रिया पार पडली,सोनवडी,कुसेगाव येथील घटना वगळता सर्वच ठिकाणी मतदान शांततेत पार पडल्याचे नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी सांगितले, दौंड तालुक्यात 49 ग्रामपंचायतीसाठी 236 प्रभागात एकूण 172370 मतदार आहेत त्यापैकी 70897 (78.34 %)पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर 62520(76.37 %) महिला मतदारांनी आपला हक्क बजावला आहे,इतर 1 अशा एकूण 133418 मतदारांनी मतदान करून पुढील पाच वर्षांसाठी गावकारभारी यांचे भवितव्य मतपेटीत बंद केले आहे,कुसेगाव येथे किरकोळ बाचाबाची झाली तर सोनवडी येथे निवडणूक अधिकाऱ्या नेच अंध व्यक्तीचे मतदान केल्याने खळबळ उडाली, परंतू नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी सदर अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात असे सांगितले,बाकी सर्वच ठिकाणी जेष्ठ आणि तरुणांची सांगड पहायला मिळाली.