शेतमालकाची ऊसतोड मजुराला मारहाण, एकाचा मृत्यू,एक गंभीर, आरोपी फरार


शेतमालकाची ऊसतोड मजुराला मारहाण, एकाचा मृत्यू,एक गंभीर, आरोपी फरार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

ऊस तोडणी साठी शेतात का आला नाही,याचा राग मनात धरून ऊस तोडणी मजुरांच्या खोपीवर जाऊन त्यांना मारहाण केली, त्यामध्ये एका मजुराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे अशी दौंड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे. फिर्यादी भट्टा गुलसिंग ब्राम्हणे वय 24 राहणार आमलया पाणी, पोस्ट केली,तालुका भगवानपुरा,जिल्हा खरगोन, मध्यप्रदेश, सध्या राहणार काळेवाडी पहाणे वस्ती  तालुका दौंड जिल्हा पुणे याने दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे, त्यामध्ये फिर्यादीने सांगितले की शेतमालकाची दोन मुले  घनश्याम भोसले,भागवत भोसले आणि सौरभ त्याचे पूर्ण नाव माहीत नाही असे तिघेजण दुकंगकीवरून हातात लोखंडी गज लाकडी दांडके घेऊन आमच्या खोपीवर आले व पर्वत गुलसिग ब्राम्हणे आणि सुनिल सत्यनारायण उर्फ गुलाब शर्मा यांना शिवीगाळ करीत  तुम्ही ऊसतोड करायला का आला नाही असे म्हणत मारहाण केली,दोघांनाही गंभीर जखमी केले  या मारहाणीत सुनिल याला जबर मार लागला होता त्याला अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते,परंतू तो मयत झाला आहे तर भट्टा हा गंभीर जखमी झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे,मारहाण करून तिन्ही आरोपी फरार झाले आहेत,त्यांच्या भा द वि कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News