चांदेकसारे गावात अयोध्या राममंदीर बांधणीसाठी करणार निधी संकलन !!


चांदेकसारे गावात अयोध्या राममंदीर बांधणीसाठी करणार निधी संकलन  !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

चांदेकसारे - उद्या रविवार दि.17 जानेवारी २०२१ रोजी प्रभु श्रीराम मंदिर अयोध्या बांधणीसाठी निधी संकलन अभियान सुरु करण्यात येत असुन श्रीराम जन्मभुमी तीर्थक्षेत्र न्यासाचे वतीने रामभक्त कार्यकर्ते निधी संकलना साठी येत असल्याची माहीती चादेकसारे ग्रामस्थांचा वतीने सुधाकर होन दिलीआहे. 

  अयोध्या भुमीवर प्रभु श्रीरामांचे भव्यदिव्य मंदिर उभारावे हि आपल्या पिढ्यां पिढ्यांचे स्वप्न होते, ते लवकरच साकारत आहे.

मागिल पिढिने या कार्यासाठी अतोनात कष्ट घेतललेे आहेत. कदाचित आपल्याला आंदोलनात काम करण्याची संधी मिळाली नसेल परंतु निधी संकलन करणे व निधी देणे हे सुध्दा रामसेवे पेक्षा कमी कार्य नाही.म्हणुनच या निधी संकलन कार्यात आपण मोठ्या संख्येने सामिल होत प्रत्येक घरापर्यंत पोहोचुन निधी संकलन करुन स्वप्नातील भारत अर्थात 

राममंदिर ते राष्ट्रमंदिर उभे करु मंदिर उभारण्याचे काम आपल्याला भेटत आहे हेच आपले भाग्य आहे ते ना मागच्या पिढीला भेटले ना पुढच्या पिढीला भेटेल परंतु आपल्याला पुढच्या पिढीला सांगता येईल की हे महान कार्यसिद्धी आम्ही योगदान दिले, मंदिर पूर्ण झाल्यावर मंदिराच्या दानपेटीत पैसे देऊन काय अर्थ आहे असे आवाहन येथील रामभक्त परीवाराचे वतिने सुधाकर होन यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News