बारामती तालुक्यामधील ग्रामपंचायत निवडणूका शांततेत पार--तहसिलदार विजय पाटील


बारामती तालुक्यामधील ग्रामपंचायत निवडणूका शांततेत पार--तहसिलदार विजय पाटील

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

           बारामती दि. 15:- बारामती तालुक्यात आज दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली . एकूण 52 ग्रामपंचायतीपैकी 49 ग्रामपंचायतीमध्ये 430 जागेसाठी 1008 उमेदवार रिंगणात होते.  बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक कोणताही अनूचित प्रकार न घडता शांततेत आणि उत्सहात पार पडली. असे प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विजय पाटील यांनी कळविले आहे.

            अंजनगाव, आंबी खुर्द, ब-हाणपूर, बाबुर्डी, चोपडज, ढाकाळे, ढेकळवाडी, देऊळगाव रसाळ, गोजुबावी, घाडगेवाडी, होळ, संदोबाचीवाडी, सस्तेवाडी, जळगांव सुपे, जोगवडी, जैनकवाडी, कटफळ, कारखेल, कांबळेश्वर, को-हाळे बु. थोपटेवाडी, खंडोबाची वाडी, खांडज, लाटे,  माळवाडी (लाटे), माळवाडी (लोणी), मेखळी, मोढवे, नारोळी, निंबुत, निरावागज, पिंपळी, सावळ, सांगवी, शिरवली, शिरष्णे, सोनवडी सुपे, सोनगाव, तरडोली, उंडवडी सुपे, वढाणे, वडगाव निंबाळकर, झारगडवाडी, पाहुणेवाडी, मळद, क-न्हेरी, मुर्टी, मोराळवाडी आणि खराडेवाडी इत्यादी ग्रामपंचायतीमध्ये सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत एकूण 84.81 टक्के मतदान झाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News