दौंडकरासाठी खुशखबर Covid लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालय दौंड सज्ज-- आरोग्य सेवा उपसंचालक पुणे डॉ नितीन बिलोलीकर यांनी घेतली माहिती


दौंडकरासाठी खुशखबर Covid लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालय दौंड सज्ज-- आरोग्य सेवा उपसंचालक पुणे डॉ नितीन बिलोलीकर यांनी घेतली माहिती

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

मागील 10 महिन्या पासून दौंड तालुका व दौंड शहरातील नागरिकांनी covid -19 शी दिलेला लढा यशस्वीतेच्या मार्गावर असल्याचे चित्र आज उपजिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाले.आज दिनांक 15/1/21 रोजी मा.उपसंचालक आरोग्य सेवा पुणे डॉ. नितीन बिलोलीकर सरानी उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे प्रत्येक्ष भेट देऊन लसीकरण तयारीचा आढावा घेऊन समाधान  व्यक्त केले.

आपल्या देशात covid लसीकरणा करिता covaxin covishield,  अशा विविध लसीना मान्यता दिली असून प्रत्येक्षात तिचे टोचन उद्या दिनांक16/1/21 रोजी सकाळी 10:30 ते 5:00या वेळेत होणार आहे

सर्वप्रथम ही लस आरोग्य कर्मचारी याना देण्यात येणार असून त्या करीता जिल्हा माहिती केंद्र पुणे यांच्याकडून लाभार्थींना sms द्वारे स्थळ व वेळ कळणार आहे.

ज्यांची नोंदणी झालेली आहे अशाच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस तूर्तास मिळणार आहे या लसीकरणासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ संग्राम डांगे व त्यांची team सज्ज असून लसीकरणासाठी आवश्यक ती सर्व तयारी पुर्ण झालेली आहे

उपजिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध झाली असून ती पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना दिली जाणार असून त्या नंतर ती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ डांगे यांनी दिली उद्या मा.आमदार राहुलदादा कुल दौंड विधानसभा मतदारसंघ,मा.सौ. शितलताई कटारिया नगराध्यक्ष दौंड,मा. विलास शितोळे उपनगराध्यक्ष दौंड यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण कार्यक्रमांची सुरुवात करण्यात  येणार असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News