विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
कोरोनाची लस अजून सुरू झाली आहे की नाही त्यावर गाफील राहून चालणार नाही, कोरोना अजून संपलेला नाही,दौंड शहरात एका सहा वर्षाच्या बाळासह एकाच कुटुंबातील 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये दोन महिला,तीन मुले व एक पुरुष असे आहेत,तर पाटस येथील एक आणि काळेवाडी येथील एक पुरुष असे एकूण आठ जण पॉझिटिव्ह आल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, यावेळी 48 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये 8 पॉझिटिव्ह तर 40 जण निगेटिव्ह आल्याचे डॉ मिलिंद कांबळे यांनी सांगितले, लोकांचा हलगर्जीपणा धोक्याचा ठरत आहे, लोक आता मास्क,सॅनिटाईझर वापरणे टाळत आहेत,समारंभात पूर्वीसारखी गर्दी वाढत आहे, त्यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले.