श्री साईबाबा संस्थानातील कर्मचारी प्रामाणिकपणाबद्ल भक्तांकडून सत्कार, 2 तोळेची सोन्याची चेन केली परत


श्री साईबाबा संस्थानातील कर्मचारी प्रामाणिकपणाबद्ल भक्तांकडून सत्कार, 2 तोळेची सोन्याची चेन केली परत

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, 

श्री साई आश्रम भक्तनिवास विभागातील कंत्राटी कर्मचारी (आऊटसौर्स) श्री.दत्तात्रय बिरदोडे व श्री.संदीप गायकवाड यांना दि.१४/०१/२०२१ रोजी साईआश्रम स्वागतकक्ष परिसरात स्वच्छता करतांना एका साईभक्ताची सोन्याची चैन (अंदाजे २ तोळे) सापडली, त्यांनी ती प्रामाणिकपणे साईआश्रम कार्यालयात जमा केली, दुसऱ्या दिवशी सदर भक्त चैन शोधत आले असता साई आश्रम  कार्यालयामार्फत ओळख पटवून ती परत देण्यात आली. सदर साई भक्तांना चैन मिळाल्यावर झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यासारखा होता. याप्रसंगी साईआस्रम भकतनिवासचे अधिक्षक श्री पुंजाहरी कोते सुमित कंपनीचे मँनेजर श्री बापुसाहेब चिंधे, शिर्डी कर्मचारी सोसायटीचे संचालक विठ्ठल पवार ,साईभक्तश्री व सौ वेणु गोपाल, पी रत्नमा ,प्रर्यवेक्षक श्री प्रकाश वाणी श्री अशोक कोते श्री प्रसाद भातोडे श्री प्रसाद गोंदकर प्रवीण धनवटे,सागर बच्छे दिंगबर दराडी व दत्तात्रय बिरदोडे  संदिप गायकवाड  यांचे प्रामाणिकपणाबद्दल सर्व कर्मचारी कौतुक होतआहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News