विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
पाटस ते दौंड पुढे सिद्धटेक असा अष्टविनायक जोडणारा मार्गाचे काम सुरू आहे, बऱ्याच अंशी काम पूर्णत्वास आले आहे, परंतू दोन तीन ठिकाणी ओढा, कॅनल यावरील पुलाची अर्धवट राहिली आहेत,आणि त्या ठिकाणी रस्ता व्यवस्थित केलेला नाही, आणि त्याचाच फटका एका महिलेला आपला जीव गमावून द्यावा लागला.पाटस ते दौंड राज्यमार्गावर बिरोबीवाडी येथे सकाळी पाटसकडून दौंडकडे जाणारी स्कुटी (अॅक्टीवा) ला दौडकडून येणारा टॅंकरची धडक होवून झालेल्या अपघात दुचाकीवरील महिला ठार झाली तर दुचाकीचालकास मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. बिरोबावाडी येथे हा अपघात झाला. अशी माहिती पाटस पोलीसांनी दिली.
कावेरा मनोहर देडगे ( वय 55 रा.खाचापुरी ता.परांडा जि.उस्मानाबाद,सध्या रा.बालेवाडी पुणे ) असे या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या अपघातात महिलेचे पती मनोहर देडगे यांना डोक्याला,हाताला.पायाला मार लागल्याने ते गंभीर स्वरूपात जखमी असून त्यांच्यावर यवत येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दाम्पत्य दुचाकीवर मतदाना साठी आपल्या गावी निघाले होते, गुरूवारी ( दि.14 ) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाटस दौंड अष्टविनायक राज्य मार्गावरील बिरोबावाडी येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ओढ्याच्या पुलावर हा अपघात झाला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्कुटी (अॅक्टीवा क्रमांक एम.एच.12,आर,जे.2707) ही पुणेकडून दौंडकडे जात असताना समोरील बाजूने दौंडकडून पाटसकडे जाणारा टॅंकरने ( क्रमांक एन,एल 01,ए,डी.6294) स्कुटीला धडक दिल्याने हा अपघात झाला.या अपघातात दुचाकीवरील महिला ही टॅंकरच्या पाठीमागील चाकाखाली गेल्याने ती जखमी झाली.तिला उपाचाराला नेत असताना उपचारापुर्वीच तिचा मृत्यु झाला तर तिच्या पतीला डोक्याला,पायाला,हाताला मार लागल्याने ते गंभीर स्वरूपात जखमी झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टॅंकरचालक पसार झाला असून टॅंकर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. पुढील तपास PSI घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे प्रदीप काळे हे करीत आहेत.