विश्व इंडियन पार्टी vip ची कोर कमिटीची बैठक मुंबई प्रदेश कार्यालयात संपन्न


विश्व इंडियन पार्टी vip ची कोर कमिटीची बैठक मुंबई प्रदेश कार्यालयात संपन्न

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

राष्ट्रीय अध्यक्ष vip भाई अविचांदणे यांच्या अध्यक्षतेखाली विश्व इंडियन पार्टी vip राष्ट्रीय स्तरावर कोर कमिटी ची बैठक घेण्यात आली या बैठकीत पश्चिम महाराष्ट्राचे सामाजिक राजकीय कार्य बघून महिला आघाडी विश्व इंडियन पार्टी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षपदी श्रीमती लताताई घोरपडे यांची निवड करण्यात आली ही निवड सर्वानुमते ठराव पास करण्यात आला अनुमोदन राष्ट्रीय महासचिव डॉक्टर अश्विनी चांदने केले सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत vip पक्ष सामोरे गेला नसून महाराष्ट्रातील वीस-पंचवीस ग्रामपंचायती vipपार्टी सामोरे जाणार व प्रस्थापित पक्षांना vipदखल घ्यावीच लागेल असे ठामपणे अध्यक्ष मार्गदर्शन भाषण राष्ट्रीय अध्यक्ष भाई जी यांनी सांगितले या बैठकीत राष्ट्रीय स्तरावरील व राज्य स्तरावरील व महाराष्ट्र प्रदेश स्तरावरील पदाधिकारी राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य हरिचंद्र कटरे अमळनेर प्रकाश जैन इंदोर m.p. दत्ता भाई जामदे कर. जितु भाई चांदणे सुरत गुजरात प्रल्हाद पद्माने कंचना चांदणे बाळासाहेब चांदणे निसर्ग चांदणे मनोज वैराळे संजय गरुड इंदोर अलोक कुमार दिल्ली इत्यादी मान्यवर नेते उपस्थित होते शेवटी आभार व्यक्त करताना राष्ट्रीय सचिव प्रकाश जैन यांनी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी व्हीआयपी पक्षाने राजकीय सामाजिक जनआंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पहिले मिशन पूर्ण केले आहे व दुसरे मिशन आता सुरू होत आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पालकमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांची शिफारस घेणे व साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार प्राप्त करण्यासाठी पक्ष सामाजिक-राजकीय जनआंदोलन रस्त्यावर करणार व रास्ता रोको च्या माध्यमातून आपले मिशन पूर्ण करणार असे राष्ट्रीय अध्यक्ष भाई अविचांदणे यांचा आदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार असे आभार व्यक्त करताना पत्रकारांसमोर बोलले यामध्ये महाराष्ट्रातील सर्व विभागाच्या अध्यक्षांचे पुढील महिन्यांमध्ये vip द्वारे चर्चा सत्र घेण्यात येणार

जाहिरात
Search
विडिओ
Recent News