विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
ग्रामपंचायत निवडनुक 15 जानेवारी रोजी होत असून आज प्रचाराच्या तोफा थांबतील, त्या निमित्ताने दौंड पोलिसांनी गोपाळवाडी गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गावातून पथसंचलन केले.
निवडणूक काळात पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत लावण्यात आलेला एकूण बंदोबस्त
7 पोलीस अधिकारी,130 पोलीस कर्मचारी त्या संदर्भात एकूण 21 मीटिंग घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, तसेच करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई सीआरपीसी 149 प्रमाणे 300 जणांविरुद्ध,सीआरपीसी 107
115 जना विरुद्ध,सीआरपीसी 144 प्रमाणे 30जणांविरुद्ध,सीआरपीसी 110 प्रमाणे 10विरुद्ध,दारू बंदी कायद्यांतर्गत केसेस 14 इस्माविरुद्धगुन्हे दाखल एकूण अंदाजे 25 हजार रुपयांचे माल जप्त,यावेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सर्व जनतेला आवाहन केले निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे आचारसंहितेचा भंग कोणीही करू नये जनतेने भयमुक्त वातावरणामध्ये मतदान करावे कोणाच्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडू नये,आणि सर्वात महत्वाचे कायद्याचा भंग कोणीही करू नये तसे करणारा विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.