मंचर विभागातील २५६ वीज कंत्राटी कामगारांनी कामगार मंत्री मा श्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर बसण्याचा केला निर्धार


मंचर विभागातील २५६  वीज कंत्राटी कामगारांनी कामगार मंत्री मा श्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर बसण्याचा केला निर्धार

सुरज बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

मंचर विभागातील वेतनाचे प्रश्न जुलै २०२०पासून बाकी असून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फ महावितरण प्रशासन व कामगार आयुक्त कार्यालय वाकडेवाडी येथे पाठपुरावा करून देखील प्रश्न न सुटल्यामुळे दिनांक ११ जानेवारी २०२१ पासून कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले या आंदोलनाचा धसका घेत महावितरणचे अधिकारी यांनी कामगार आयुक्त कार्यालयात धाव घेत दिनांक १३ जानेवारी २०२१ पर्यंत मूळ मालक म्हणून  आम्ही पगार देऊ असे लेखी आश्वासन आश्वासन कामगार उपआयुक्त यांना देऊन त्याची प्रत संघटनेला दिली असून १३ जानेवारी २०२१ ला कामगारांच्या खात्यावर महावितरण प्रशासनाने पगार न टाकल्यास मंचर विभागातील सर्व कंत्राटी कामगारांनी कामगार मंत्री मा श्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या आंदोलनासाठी अथक परिश्रम संघटनेचे महामंत्री मा श्री सचिन मेंगाळे, संघटनमंत्री राहुल बोडके,कोषाध्यक्ष मा श्री सागर पवार,पुणे ग्रामीण अध्यक्ष मा श्री अशोक गहीने,कोषाध्यक्ष मा श्री सागर आहिनवे,मंचर विभाग अध्यक्ष मा श्री अविनाश शेटे,संघटनमंत्री मा. श्री. दिपक शिंदे यांनी घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News