बीडी कामगारांच्या कायदे व कल्याणकारी योजना बंद करू नका. अन्यथा रस्तावर उतरण्याचा दिला इशारा  भारतीय मजदूर संघाची मागणी 


बीडी कामगारांच्या कायदे व कल्याणकारी योजना बंद करू नका. अन्यथा रस्तावर उतरण्याचा दिला इशारा  भारतीय मजदूर संघाची मागणी 

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

 भारत सरकारचे  बिडी कामगारांचे कायदे व कल्याणकारी योजना पुर्ववत सुरू करण्यासाठी सोनवणे हाॅस्पीटल भवानी पेठ पुणे येथे अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने निर्देशने करण्यात आली.  या वेळी संघटनेचे सरचिटणीस उमेश विस्वाद यांनी भारत सरकारने दोन महिन्यां आत देशभरातील बिडी कामगारांना दिलासा दिला नाही तर सर्व बिडी कामगार देशव्यापी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरचिटणीस उमेश विस्वाद यांनी दिला आहे.  

         बीडी कामगारांच्या रोजगार  चे निरमन करणारे कायदे   OCCUPATION SAGETY AND HELTH( O S H ) मध्ये समाविष्ट करून रद्द केले आहेत. पण बिडी कामगारांच्या फायदेशीर तरतुदींचा नव्या कोड मध्ये समाविष्ट नसल्यामुळे ऊद्योगाजकांकडून मनमानी व शोषण केली जाईल . तसेच भारत सरकारच्या G S T करप्रणाली लागु केल्या मुळे बिडी वेलफेअर सेस कायदा रद्द केला म्हणून गेल्या ३/४ वर्षं पासून कल्याणकारी योजना बंद अवस्थेत आहेत.  बोर्डा तर्फे बिडी कल्याणकारीयोजना ईतर योजनां मध्ये वर्ग केल्याचं सांगीतले जाते. पण नॅशनल स्कॉलरशीपमध्धे वर्ग झाल्या मुळे एकाही बिडी कामगारांना शिष्यवृत्ती मिळालेली 

  नाही.  अशीच अवस्था घरकुल व आरोग्य सुविधांची आहे.  या मुळे बीडी कामगारांचे जीवनमान खालावले आहे त्यामुळे कामगारांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून बिडी कामगारांचे कायदे व कल्याणकारी योजना पुर्ववत सुरू राहाव्यात अशी मागणी संघटनेने केली आहे.  

    भारतातील १७ राज्यातून २८० बीडी कामगार दवाखाने मार्फत ८० लाख नोंदणीकृत बिडी कामगारांना कल्याणकारी सुविधा मिळतात असंघटीत क्षेत्रातील चांगली कल्याणकारी योजना बंद अवस्थेत असल्याने सरकारने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अन्यथा बिडी कामगारांना रस्ता वर उतरून नाय मागावा लागला असा इशारा संघटने दिला आहे.  

      या वेळी झालेल्या निदर्शनात सरचिटणीस उमेश विस्वाद, महाराष्ट्र राज्य  बीडी कामगार संघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण,  अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सेक्रेटरी सचिन मेंगाळे यांनी मार्गदर्शन केले.  

      मागण्यांचे निवेदन डाॅ एम लक्ष्मी यांनी स्विकारले व वेलफेअर बोर्ड च्या मुख्य कार्यालय मार्फत मा केंद्रीय कामगार मंत्री यांना पाढवण्या बाबतीत आश्वासन दिले.  शिष्टमंडळात उमेश विस्वाद , अर्जुन चव्हाण, सचिन मेंगाळे,  वासंती तुम्मा, विजया लक्ष्मी येमुल ,  सहभागी होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News