दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यवत विकास आघाडी पॅनलची प्रचारात आघाडी पुन्हा विकासाच्या जोरावर सत्तेत येण्याचे संकेत


दौंड तालुक्यातील यवत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यवत विकास आघाडी पॅनलची प्रचारात आघाडी पुन्हा विकासाच्या जोरावर सत्तेत येण्याचे संकेत

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणूक यवत ता. दौंड जि. पुणे १७ जागांसाठी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मा.आमदार रमेश  थोरात यांच्या गटाचे १७ उमेदवार उभे आहेत. यवत विकास आघाडी पॅनल चे अध्यक्ष मा. पंचायत समिती सदस्य श्री रामदास दोरगे व मा.पंचायत समिती सदस्य श्री कुंडलिक खुटवड व सदानंद  दोरगे पॅनेलचे नेतृत्व करत आहेत. दहा वर्षापासून थोरात गटाची सत्ता यवत ग्रामपंचायत वर आहे  दहा वर्षांमध्ये तीस कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत यवत विकास आघाडीचे नेत्यांचा असं म्हणने आहे की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे यवत मध्ये. १४ कोटी ४१ लाखाची पाणीपुरवठा फिल्टर योजना संपुर्ण गावासाठी  मंजुर झाली आहे. विकास आघाडीने विकास केल्यामुळे  यवत मधील मतदार समाधानी आहेत. प्रचारामध्ये यवत विकास आघाडी पॅनलचे वर्चस्व दिसत असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालचे वाळू सरकताना दिसत आहे त्यामुळे अपप्रचाराला सर्वसामान्य नागरिकांनी भुलून जाऊ नये जे पंचवीस वर्षात झाले नव्हते ते दहा वर्षांमध्ये यवत विकास आघाडीने करून दाखवले आहे.  आमच्याशी बोलताना यवत मधले विकास आघाडीचे ओबीसी नेते, श्री मंगेश राजाराम रायकर यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News