नायलॉन चा मांजा ठरला काळ!! प्रणय ठाकरेचा दुचाकीवरून जाताना गेला जीव!


 नायलॉन चा मांजा ठरला काळ!! प्रणय ठाकरेचा दुचाकीवरून जाताना गेला जीव!

संक्रांत म्हणल कि तिळगुळ, वाणवसा आणि पतंग या गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येतात. मात्र, याच पतंगाने अनेकांचे जीवही धोक्यात येतात. नागपुरात अशाच प्रकारच्या घटना सातत्याने होताना दिसत आहेत.

बंदी असून ही सर्रास विकला जाणारा नायलॉन मांजा अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. नागपुरात काल एका 20 वर्षीय तरुणाचा भर वाहतुकीत गळा चिरला जाऊन मृत्यू झालाय. प्रणय ठाकरे असं या तरुणाचं नाव आहे. 

तर गेल्या 15 दिवसात नागपुरात नायलॉन मांजा आणि रस्त्याच्या कडेला केल्या जाणाऱ्या धोकादायक पतंगबाजीमुळे अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. अनेक लोक मांजा वापरून पतंग उडवू नका आणि इतरांचे जीव धोक्यात आणू नका म्हणत पुढे येत आहेत. हे पतंग उडवणारे लोक कोण होते? कोणामुळे प्रणय मृत्युमुखी पडला याचा शोध अद्याप लागलेला नाही. सण साजरे करताना कोणाचा जीव जाणार नाही एवढी काळजी आपण आवश्य घ्यायला हवी. नाही तर त्या सणाला गालबोट लागते आणि कुटुंब उध्वस्त होते.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News