राजमाता जिजाऊंची शिकवण समाजासाठी सदैव प्रेरणादायी – आमदार आशुतोष काळे


राजमाता जिजाऊंची शिकवण समाजासाठी सदैव प्रेरणादायी – आमदार आशुतोष काळे

 - राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करतांना आमदार आशुतोष काळे  समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

          छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणीच ज्ञान,चातुर्य, चारित्र्य, संघटन शौर्याचे धडे देवून राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी केलेला त्याग अद्वितीय असून राजमाता जिजाऊंची शिकवण समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते.

         पुढे बोलतांना ते म्हणाले की, समाजासाठी जगणारी व राष्ट्रहित जोपासणारी पिढी निर्माण होण्यासाठी घराघरात माता जिजाऊ निर्माण झाल्या पाहिजे. माता जिजाऊ निर्माण होण्यासाठी स्वाभिमानी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या आदर्श विचारांवर पाऊल ठेवून वाटचाल करणे गरजेचे असून त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. देशात व राज्यात मागील काही वर्षापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांवर अत्याचर करणाऱ्या गुन्हेगारांचे हात कलम केले जायचे. महाविकास आघाडी सरकारने देखील महिलांवरील होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायद्याला मंजुरी दिली आहे. या कायद्यामुळे मुली व महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी या कायद्याची महत्वाची मदत होणार आहे. या कायद्यानुसार आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. आरोपी विरोधात २१ दिवसात कारवाई पूर्ण करण्यात येणार असून पोलिसांना १५ दिवसांत घटनेचा तपास पूर्ण करणे बंधकारक आहे त्यामुळे महिला-मुलींकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जरब बसून महिलांवरील अत्याचार कमी होण्यास मदत होणार असली तरी देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने महिलांचा सदैव सन्मान व सुरक्षा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून आपले कर्तव्य पाळावे असे आवाहन केले.

                यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. माधवीताई वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, कृष्णा आढाव, दिनकर खरे, फकीरमामु कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, संदिप कपिले, वाल्मिक लहिरे, प्रकाश दुशिंग, नारायण लांडगे, राजेंद्र जोशी, अशोक आव्हाटे, प्रशांत वाबळे, दिनेश पवार, सोमेश आढाव, संदीप सावतडकर, संदीप देवळालीकर,धनंजय कहार, राजेंद्र आभाळे, राजेंद्र खैरनार, एकनाथ गंगूले, योगेश नरोडे, विकास बेंद्रे, सौ. रश्मीताई कडू, सौ. माधवीताई दिवे, गणेश लकारे, समीर वर्पे, विकी जोशी, प्रसाद रुईकर, सतीश भुजबळ, राजेंद्र भुजबळ, सागर जाधव, राहुल चवंडके, योगेश वाणी, प्रताप गोसावी, भोलू शेख, संकेत पारखे, मिलिंद सरोवर, गणेश काकड, छोटू बैरागी, नितीन शेलार, गोविंद वाकचौरे आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News