कोपरगाव येथील लुंबिनी उपवन अरय्यबुध्द विहार परिसरात सुशोभीकरण व जागे संदर्भात आ. आशुतोष काळे यांना निवेदन !!


कोपरगाव येथील लुंबिनी उपवन अरय्यबुध्द विहार परिसरात सुशोभीकरण व जागे संदर्भात आ. आशुतोष काळे यांना निवेदन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव-आज दि.११-१-२१रोजी. कोपरगाव तालुक्यातील लुंबिनी उपवन बुद्ध विहार याठिकाणी विहार परिसराचे सुशोभिकरण करणे व जागेसंदर्भात आज दिनांक 11 जानेवारी रोजी कोपरगाव चे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांना कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व बुद्ध धम्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भिक्खू आनंद सुमन सिरी व मार्गदर्शक भिक्खू काश्यप तसेच बुद्ध धम्म प्रसारक मंडळाचे सदस्य सचिव- रंभाजी रणशुर. सल्लागार अजय विघे (पत्रकार), गणेश पवार (पत्रकार), अनिल नवगिरे, राहुल धिवर, माजी नगरसेवक अरविंद विघे  यांच्या उपस्थित आमदार आशुतोष दादा काळे यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करून विहाराच्या जागेसंदर्भात व विकास कामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले.

     सविस्तर वृत्त असे की बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव हे गेल्या 35 वर्षापासून लुंबिनी उपवन बुद्धविहाराचे संगोपन करीत आहे त्या ठिकाणी आज पर्यंत धम्मपरिषद, वर्षवास कार्यक्रम, लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचा नागरी सत्कार तसेच दरवर्षी श्रामनेर शिबिर भरण्याचे काम ट्रस्टच्या माध्यमातून झाले आहे तसेच संपूर्ण परिसराला उपासक-उपासिका यांच्या माध्यमातून वॉल कंपाऊंड चे काम पूर्ण झाले असून सुविधा अंती अजून काही काम बाकी असून तसेच जागेसंदर्भात काम अपूर्ण असून आमदार आशुतोषदादा काळे यांच्या बरोबर सविस्तर चर्चा केली असून त्यांनीदेखील पुढील काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन दिले त्यामुळे सर्व बौद्ध तसेच आंबेडकर प्रेमी मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News