सत्ताधारी विरोधकांकडून कोपरगाव शहर विकासाला खिळ – मंदार पहाडे


सत्ताधारी विरोधकांकडून कोपरगाव शहर विकासाला खिळ – मंदार पहाडे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

               निवडणुकीपुरते राजकारण व निवडणूक संपल्यावर विकासकारण या आमदार आशुतोष काळे यांच्या विचारातून राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी कोपरगाव शहराच्या विकासाला प्राधान्य देत नगराध्यक्ष विजय वहाडणे तसेच सत्ताधारी नगरसेवकांना सहकार्य केले आहे. मात्र ज्यांना सदासर्वदा राजकारण करायचे आहे त्या सत्ताधारी विरोधकांनी विकासकामांच्या निविदा मंजूर करण्यासाठी स्थगिती देवून कोपरगाव शहर विकासाला खीळ घातला असल्याची टीका स्थायी समितीच्या कमिटीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक मंदार पहाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

             दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात मंदार पहाडे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव शहराच्या सर्वच प्रभागातील विविध विकास कामांच्या निविदा मंजूर करण्यासाठी स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेत कोपरगाव शहरातील प्र.क्र. २ मध्ये बोरावके घर ते आढाव घर रस्त्याचे खडीकरण करणे व भुयारी गटार बांधकाम करणे, तसेच येवला रोड भागातील नगरपरिषद शाळा छत कोबा आणि वॉटर प्रूफिंग ट्रीटमेंट करणे, प्र.क्र. ३ मधील बाळासाहेब सातभाई जलकुंभ ते महाजन वखार ते जगन्नाथ सोनवणे घर भुयारी गटार बांधकाम, येवला नाका ते मार्केट यार्ड, मार्केट यार्ड ते आण्णाभाऊ साठे चौक रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, प्र.क्र.६ मध्ये एस. जी. विद्यालय ते हेम मेडिकल रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण व साईड पट्ट्यांना पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अहिंसास्तंभ ते आठरे घर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण व साईड पट्ट्यांना पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्र.क्र.७ मध्ये मच्छिंद्र उज्जैनवाल घर ते रीळ घर परिसर रस्त्यास पेव्हिंग ब्लॉक बसविणे, हसन कुरेशी घर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्यास पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्र.क्र. ११ मध्ये गांधीनगर भागातील पुरुष सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करणे, प्र.क्र. ११ पगारे घर ते जोगदंड घर भुयारी गटार बांधकाम करणे आदि विकास कामांच्या निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आल्या होत्या. तसेच कोपरगाव नगरपरिषद हद्दीत उद्यान विकसित करणे व खेळणी साहित्य बसविणे, भारतीय बैठक पद्धतीचे जैविक शौचालय (एफ.आर.पी. बायो टॉयलेट) उभारणी करणे, कोपरगाव नगरपरिषद मालकीचे उंच जलकुंभ व संपहाऊसची साफ सफाई करणेच्या निविदा ठेवण्यात आल्या होत्या. सर्व निविदांना मंजुरी मिळून शहरात विकास कामे सुरु होतील अशी सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षा होती मात्र शहर विकासाशी घेणं देणं नसणाऱ्या सत्ताधारी विरोधकांनी निविदा मंजूर करण्यासाठी स्थगिती देवून कोपरगाव शहराचा विकास न करण्याची मानसिकता दाखवून दिली आहे. विकासकामांना खीळ घालण्याची त्यांची सवय जुनीच असून परमेश्वर त्यांना कोपरगाव शहराचा विकास करण्याची सद्बुद्धी देवो असे नगरसेवक मंदार पहाडे यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News