जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन


जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

                पुणे,दि. 12: जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना आज जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

                जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपजिल्हाधिकारी अनुक्रमे संजय तेली, प्रवीण साळुंके, सुरेखा माने, राणी ताटे, स्नेहल भोसले, खनि कर्म अधिकारी संजय बामणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उत्तम पाटील, तहसिलदार शुभांगी फुले यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News