कामठवाडीतील सुभाष दुर्गाडे एमडीआरटीचे मानकरी


कामठवाडीतील सुभाष दुर्गाडे एमडीआरटीचे मानकरी

बारामती : प्रतिनिधी 

विमा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वाल्हे (ता.पुरंदर) गावच्या कामठवाडी येथील सुभाष गणपत दुर्गाडे हे एमडीआरटीचे मानकरी ठरले आहेत. अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेला उपस्थित राहण्याची संधी देखील त्यांना मिळणार असल्याने सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

वाल्हे परिसरात पहिल्यांदाच एमडीआरटीचे मानकरी ठरलेले सुभाष दुर्गाडे हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांचे लहान बंधू आहेत. तर भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पुणे जिल्हा शाखाधिकारी बाळासाहेब डोईफोडे, उपशाखाधिकारी अजित जोशी, शाखा प्रबंधक विनय कुलकर्णी, सासवडचे अजय कांबळे तसेच विकास अधिकारी सचिन ठुबे आदी मान्यवरांचे सुभाष दुर्गाडे यांना मार्गदर्शन लाभले आहे.

यावेळी एमडीआरटीचे मानकरी ठरल्याबद्दल एल.आय.सी.च्या पदाधिकाऱ्यांसह प्रा.दिगंबर दुर्गाडे मित्र मंडळ तसेच वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, सुर्यकांत भुजबळ, लवथळेश्वर पतसंस्थेचे चेअरमन रमेशशेठ लेंडे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पवार, प्रा. संतोष नवले, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प.अशोक महाराज पवार, उद्योजक सुनील पवार आदी मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News