आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची जयंती साजरी.


आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची जयंती साजरी.

 शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

 येथील आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालय व महाविद्यालया राजमाता जिजाऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर बी.एड.चे प्राचार्य डॉ रोहिदास उदमल्ले यांनी आपल्या मनोगतात जिजामाता यांचा सर्व मुलींनी आदर्श घ्यावा आणि विवेकानंदांचा मुलांनी आदर्श घ्यावा असे सांगितले आणि शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना थोर महिला व पुरुष यांचे चरित्र समजावून सांगावे असे आवाहन केले. डीएड चे प्राचार्य अरुण चोथे यांनी आपल्या मनोगतात जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या गुणांचा अवलंब करावा असे सांगितले.

     याप्रसंगी डी.एड.चे विभाग प्रमुख प्रा.आदिनाथ अन्नदाते, प्रा.रावसाहेब शेळके, प्रा.अमोल गायकवाड, प्रा.श्री.प्रमोद फलके, प्रा.श्रीम.रोहिणी आघवणे,प्रा.श्रीम.शीतल शेरकर, प्रा.मनोज नरवडे, बी.एड.चे प्रा.भगवान बारस्कर,प्रा.सुधीर खिल्लारे,प्रा.राजेंद्र बांगर,प्रा.डॉ.भाऊसाहेब देवकाते,प्रा.चेतन गर्जे,प्रा.स्मिता नाईक,प्रा.प्रकाश गांगर्डे,ग्रंथपाल श्री.राजेंद्र काळे,कार्यालयीन कर्मचारी श्रीम.शोभा शिंदे,श्री.अविनाश दारकुंडे, श्रीम.मनीषा शेळके,शिक्षकेतर कर्मचारी राम गाडेकर,दिपक पवार,सोमनाथ जाधव,रमेश खेडकर आदीं उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ.देवकाते यांनी आभार प्रदर्शन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News