जनशिक्षण संस्थान तर्फे स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी!! महिलांनी आत्मनिर्भर व्हावे- मनीषा शिंदे


जनशिक्षण संस्थान तर्फे स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी!! महिलांनी आत्मनिर्भर व्हावे- मनीषा शिंदे

दातरंगेमळा येथील जनशिक्षण संस्थान तर्फे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मनपा शिक्षक संघाच्या अध्यक्षा मनीषा शिंदे,जनशिक्षण संस्थानचे डायरेक्टर बाळासाहेब पवार,सौ.कमल पवार, शफाकत सय्यद,सौ कुंदा शिंदे,अनिल तांदळे,कविता वाघेला,घाटवीसावे मॅडम आदींसह प्रशिक्षणार्थी.(छाया-अमोल भांबरकर)  

नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती सर्वत्र उत्साहाने साजरी होत आहे.राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्याग करून वेळ प्रसंगी कठोर निर्णय घेऊन महिला सक्षमीकरणा साठी मोठे कार्य केले आहे. तसेच महिलांना मानसन्मान मिळवून दिला.त्यांच्या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे दैवत घडले आहे. महिलांनी स्वतःमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ जिवंत ठेवून आपल्या हातून सुसंस्कृत शिवबा घराघरात घडवायचा आहे.यासाठी महिलांनी आत्मनिर्भर व्हावे.असे प्रतिपादन मनपा शिक्षक संघाच्या अध्यक्षा मनीषा शिंदे यांनी केले. दातरंगेमळा येथील जनशिक्षण संस्थान तर्फे  स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी मनीषा शिंदे बोलत होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी जनशिक्षण संस्थानचे डायरेक्टर बाळासाहेब पवार,सौ.कमल पवार,शफाकत सय्यद,सौ कुंदा शिंदे,अनिल तांदळे,कविता वाघेला, घाटवीसावे मॅडम आदी उपस्थित होते.पुढे बोलताना मनीषा शिंदे म्हणाल्या कि,भारत सरकारचा कौशल्य विकास कार्यक्रम हा अत्यन्त उत्कृष्ट व फायदेशीर आहे.जनशिक्षण संस्था हि सेवाभावी संस्था आहे.येथे महिलांसाठी रांगोळी,मेहेंदी,भरत काम,फॅशन डिझायनिंग, शिवणकाम,ब्युटीपार्लर,अगरबत्ती तयार करणे असे विविध कोर्स नाममात्र शुल्क घेऊन शिकवले जातात.यामुळे महिलांना रोजगार मिळेल व भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होईल.

प्रास्तविकात जनशिक्षण संस्थानचे डायरेक्टर बाळासाहेब पवार म्हणाले कि,भारत सरकारने फक्त कामगारच नव्हे तर अल्पशिक्षित समाजातील दुर्बल घटक,सुशिक्षित बेकार,बचत गट,महिला सर्वांना जनशिक्षण संस्थान मार्फत प्रशिक्षणाची संधी निर्माण केली आहे.२५ महिलेचा गट तयार असल्यास जागेवर जाऊन प्रशिक्षण दिले जाते.कोर्स पूर्ण झाल्यावर भारत सरकारचे प्रमाणपत्र दिले जाते.महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात.राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी कार्य करावे.भारतात अनेक महिलांनी उच्च पदस्थ राहून त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे.          सूत्रसंचालन सौ.कुंदा शिंदे यांनी केले तर आभार शफाकत सय्यद यांनी मानले.                                                          

जाहिरात
Search
विडिओ
Recent News