लायनेस क्लब ऑफ मिडटाऊनच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन


लायनेस क्लब ऑफ मिडटाऊनच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

लायनेस क्लब ऑफ मिडटाऊच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा सुरेखा कदम,  राजश्री मांढरे, शारदा होसिंग, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, सविता जोशी, सविता शिंदे, सुरेखा भोसले, अरुणा गोयल, कांता बोठे आदि. (छाया : राजु खरपुडे    

आदर्श व्यक्तीमत्वांचे विचाराच समाजातील अनिती संपवू शकते - सुरेखा कदम

नगर (प्रतिनिधी संजय सावंत) - संत, महंत, विचारवंत, क्रांतिकारक यांनी मानव कल्याण आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले, तर काहींनी प्राणपणास लावले. मानव कल्याणाचा विचार सार्‍या विश्‍वाला देत हिंदू संस्कृतीची जगाला नव्याने ओळख करु देत मानवी जीवनाला व युवा शक्तीला ऊर्जा प्राप्त करुन देण्याचे काम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी केले आहे. आज या थोर व्यक्तींचे विचार आणि कार्य कृतीतून दिसले पाहिजे. समाजात स्त्रीयांवर वाढत चालले अत्याचार, विकृतीने युवा पिढी भरकटत चालली आहे. अशा परिस्थिती थोरांची शिकवण आणि विचार समाजात रुजविण्याची गरज आहे. माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले तर विवेकानंदांनी युवा पिढीला "बंधू-भगिनी" च्या रुपाने विश्‍वाला प्रेरणा दिली. आज या व्यक्तीमत्वांचे विचाराच समाजातील अनिती संपवू शकते. त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लायनेस क्लब ऑफ मिडटाऊच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा सुरेखा कदम, माजी अध्यक्षा राजश्री मांढरे, सचिव शारदा होसिंग, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, सविता जोशी, सविता शिंदे, सुरेखा भोसले, अरुणा गोयल, कांता बोठे आदि उपस्थित होत्या.

     यावेळी शारदा होसिंग  म्हणाल्या समाजाच्या उद्धारासाठी आपले आयुष्य पणाला लावणारे अनेक थोर-महात्म्या होऊन गेले आहेत. समाजातील दु:ख कमी व्हावे, समाज जागृत व्हावा यासाठी त्यांनी कार्य केले. त्यांचे विचार व कार्याची आठवण प्रत्येक पिढीला झाली पाहिजे. यासाठी विविध उपक्रमांची गरज आहे. अशा उपक्रमातून समाजप्रबोधनाचे काम होत असते. माँ जिजाऊ कर्तुत्व व स्वामी विवेकानंद यांचे विचार सक्षम समाज घडविण्यासाठी प्रेरक आहेत. याप्रसंगी राजश्री मांढरे यांनी लायनेस क्लबच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News