राजमाता जिजाऊ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती विविध कार्यक्रमांनी नवले हॉस्पिटल येथे साजरी


राजमाता जिजाऊ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती विविध कार्यक्रमांनी नवले हॉस्पिटल येथे साजरी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

अस्तित्व फाऊंडेशन आणि नवले हॉस्पिटल आयोजीत राजमाता जिजाऊ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती नवले हॉस्पिटल येथे साजरी केली. 

     भाजपचे जेष्ठ नेते दादाराम ढवाण यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगोंदा तालुका वैद्यकीय आधिकारी नितीन खामकर, श्रीगोंदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतिश बोरा, पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक माळी ,श्रीगोंदा नगरपरिषदचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, होले मल्टीस्पेशिलीटी हॉस्पिटलचे डॉ. सुवर्णा होले, नवले हॉस्पिटलचे डॉ.सचिन नवले व डाॅ.पल्लवी नवले यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी महिलांसाठी सर्वरोग निदान शिबिर व कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. श्रीगोंदा तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलिस निरीक्षक श्रीगोंदा पोलिस स्टेशन, तालुका वैद्यकीय अधिकारी ,प्राथमिक आरोग्य केंद्र लोणीव्यंकनाथ, बेलवंडी, आढळगाव, पिंपळगाव पिसा, कष्टी, मांडगण ,श्रीगोंदा, होले मल्टीस्पेशिलीटी हॉस्पिटल, परमपूज्य मोरेदादा हाॅस्पिटल, मेडीकेअर हॉस्पिटल, साबळे हॉस्पिटल, गदादे हाॅस्पिटल 

,श्रीगोंदा पत्रकार परिषद, श्रीगोंदा तालुका पक्षकार संघ, बहुजन पत्रकार परिषद यांना कोरोना योद्धा गौरव पदक देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी भिमराव आनंदकर ,माधव बनसुडे,संकेत खामकर, संदिप उमाप, शिवाजी साळुंके, बाळासाहेब काकडे, अमोल गव्हाणे, अरविंद कासार, विलास तरटे, डॉ नम्रता सांगळे, संध्या रसाळ, अश्विनी शिंदे, मोहिनी डोळसकर, सुनंदा घोडके, वैशाली घोडके, बरखा आत्तार, दत्तात्रय पिंपळे, मयुर औटी, कल्पना लोहिरे, शहाजी पांढरकर, राहुल आळेकर ,प्रियंका पवार, स्वाती ठोसरे, रूपाली आळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पाडला सूत्रसंचालन व प्रास्ताविक अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख आळेकर यांनी केले तर अस्तित्व फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विलास तरटे सर यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News