फिनिक्स फौंडेशनच्या मोफत आरोग्य शिबीरात 213 रुग्णांची तपासणी


फिनिक्स फौंडेशनच्या मोफत आरोग्य शिबीरात 213 रुग्णांची तपासणी

फिनिक्स फौंडेशनच्यावतीने नागरदेवळे येथे मोफत आरोग्य शिबीराप्रसंगी मोफत मास्क, सॅनिटायझर, पीपीई किटचे वाटप भिंगार कँम्प पोलिस स्टेशनचे पो.नि.प्रविण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, विठ्ठल राहिंज, सौरभ बोरुडे, पो.कॉ.सचिन धोंडे, वैभव दानवे आदि. 

वंचित-दीनदुबळ्यांना आरोग्य सेवेतून आधार देण्याचे फिनिक्सचे कार्य प्रेरणादायी  - पो.नि. प्रविण पाटील

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त फिनिक्स फौंडेशनच्यावतीने नागरदेवळे येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोफत मास्क, सॅनिटायझर, पीपीई किटचे वाटप भिंगार कँम्प पोलिस स्टेशनचे पो.नि.प्रविण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, विठ्ठल राहिंज, सौरभ बोरुडे, पो.कॉ.सचिन धोंडे, वैभव दानवे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी पो.नि.प्रविण पाटील म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य शिबीराची अत्यंत गरज आहे. राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. त्यांनी दाखविलेल्या समाजहिताच्या मार्गावर चालतांना आपल्या कृतीतून समाजाची सेवा झाली पाहिजे; तेच कार्य जालिंदर बोरुडे करत आहेत. अशा कार्यातून समाजातील दु:ख कमी होण्यास मदत होते. वंचित दीनदुबळ्यांना आरोग्य सेवेतून आधार देण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पो.नि.पाटील यांनी केले. प्रास्तविकात जालिंदर बोरुडे म्हणाले, सर्वच महापुरुषांनी समाजातील वंचितांना आधार देण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य आजही समाजाला दिशादर्शक आहे. त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेऊन फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो. मोफत शिबीर ही आजच्या समाजाला दिलासा देणारे ठरत आहेत. हे उपक्रम फौंडेशन सातत्याने राबविल, असे सांगितले.

याप्रसंगी विठ्ठल राहिंज म्हणाले, आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे देणे लागतो, या भावनेतून काम केले पाहिजे. आज गरज असलेल्या वस्तू वाटप केल्याने आत्मिक समाधान लाभले आहे. अशा उपक्रमांना आपले नेहमीच सहकार्य राहील, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब धीवर यांनी केले तर सौरभ बोरुडे यांनी आभार मानले. या शिबीरात 213 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News