WhatsApp वरुन Signal वर ट्रान्सफर होताय? ग्रुप आहे तसा हलवण्याची "ही" आहे सोपी पद्धत..


WhatsApp वरुन Signal वर ट्रान्सफर होताय? ग्रुप आहे तसा हलवण्याची "ही" आहे सोपी पद्धत..

WhatsApp ने युझरला ही पॉलिसी स्विकारण्याशिवाय कसलाही पर्याय ठेवला नाहीये. येत्या 8 फेब्रुवारीपासून WhatsApp आपल्या युझरचा डेटा फेसबुक आणि संबंधित कंपन्यांशी शेअर करु शकणार आहे.  युझर्सनी आपल्या प्रायव्हसीची चिंता व्यक्त करत WhatsApp ला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. 

WhatsApp ऐवजी Signal आणि Telegram सारख्या ऍपकडे ते वळत आहेत. जे प्रायव्हसीबाबत WhatsApp पेक्षा अधिक सुरक्षित आहेत. 

तुमचे ग्रुप WhatsApp वरुन Signal वर स्थलांतर करणाऱ्यांसाठी "हे" करा-

सिग्नलवर नवा ग्रूप बनवा-

WhatsApp चा ग्रुप सिग्नलवर आहे तसा आणण्यासाठी सर्वांत आधी Signal वर ग्रुप काढावा लागेल. हा ग्रुप काढण्यासाठी सर्वांत आधी किमान एक तरी सदस्य त्यात ऍड करावा लागेल. WhatsApp प्रमाणेच ग्रुपचे नाव, त्याला एक फोटो आयकॉन लावा.

ग्रुपची invite link तयार करा-

ग्रुप काढल्यानंतर त्या ग्रुपच्या सेटींग ऑप्शनमध्ये जा. तिथे तुम्हाला "ग्रुप लिंक" नावाचा ऑप्शन मिळेल. ग्रुप लिंक टॉगल ऑन करा आणि ती invite link शेअर करा.

Invite link शेअर करा-

एकदा का तुम्हाला ग्रुपची इन्व्हाईट लिंक आली की ती लिंक तुम्ही तुमच्या आधीच्या व्हॉट्सएप ग्रुपवर टाकू शकता. जेणेकरुन तुमच्या त्या WhatsApp ग्रुपचे सदस्य Signal ऍपवरील ग्रुपमध्ये स्थलांतर करु शकतील. WhatsApp वरचा सदस्य पाहून तो सिग्नलवर जाऊन एकेक करत ऍड करत बसण्याचे कष्ट वाचतील. यामुळे ऍडमिनचा खुप मोठा त्रास वाचेल.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News