गेलं दौंड खड्ड्यात भाग 6!!! दौंड मध्ये पार्किंग सुविधा नसल्याने रस्ते असून अडचण, नसून खोळंबा, अशी परिस्थिती


गेलं दौंड खड्ड्यात भाग 6!!!  दौंड मध्ये पार्किंग सुविधा नसल्याने रस्ते असून अडचण, नसून खोळंबा, अशी परिस्थिती

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड शहरात पार्किंग (वाहनतळ) सुविधा नसल्यामुळे दौंड मध्ये नागरिकांना रस्ते असून अडचण आणि नसून खोळंबा अशी म्हणण्याची वेळ आली आहे.दौंड शहरातील अंतर्गत रस्ते गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत,पण अजून काही पूर्णत्वाला गेले नाहीत, आणि ज्याठिकाणी झाले तेथे दुचाकी,चारचाकी रस्त्यावरच लावल्या जात आहेत,दौंड मुख्य शहरात मध्यवर्ती भागात नगरपालिका,पंचायत समिती कार्यालय, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सेंट्रल बँक,व्यापार पेठ, विद्यालय, अष्टविनायक जाणारा मुख्य रस्ता तसेच पोलीस स्टेशन आहे,या सर्वच ठिकाणी शहरासह तालुक्यातील लोक येत आहेत त्यांच्या दुचाकी लावण्याचीच वानवा,तर चारचाकी पोलीस वसाहत च्या बाजूला रस्त्यावरच लावल्या जात आहेत, आणि अगोदरच छोटे रस्ते त्यात फुटपाथ करून ठेवलाय तो दुकानदार यांच्या हिताचा झाला आहे, पूर्वी हॉटेल व्यवसायिक यांना येथे वाहने उभी करू नये असे फलक लावावे लागत होते आता फुटपाथ मुळे सोपे झाले आहे, पार्किंग (वाहनतळ) सुविधा नसल्यामुळे तालुक्यातून येणारे लोक दुचाकी रस्त्यावरच लावून सर्व कार्यलयामध्ये जातात,रस्त्यात येत असलेले अतिक्रमण न हटवता मुळात कमी असलेल्या  रस्त्यावर दुचाकी पार्किंग मुळे रस्ता अरुंदच राहतो आहे,त्यामुळे नागरिकांना दौंडचे रस्ते म्हणजे असून अडचण अन नसून खोळंबा अशी म्हणायची वेळ आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News