विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :
याविषयी सविस्तर माहिती देताना श्री गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक आघाडी म्हणाले की श्री अरुण गाडे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली कै. तुकाराम भगवान साखरे केंद्रप्रमुख पानशेत यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंब पेन्शन योजना , अनुकंपा व इतर शासकीय लाभ त्यांच्या कुटुंबीयांना मिळण्यासाठी त्वरित कार्यवाही होणे आवश्यक आहे .
कै . तुकाराम भगवान साखरे केंद्रप्रमुख केंद्र - पानशेत ता. वेल्हे यांचे शासकीय कर्तव्यावर असताना अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना जे दु:ख झाले त्यामध्ये आपण सर्व सहभागी आहोत , त्यांच्या कुटुंबीयांचे झालेलं नुकसान भरून निघणारे नाही, तरी त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय कुटुंब पेन्शन योजनेचा , अनुकंपा व इतर शासकीय लाभ आपल्या स्थरावरून विनाविलंब मंजूर करावे व यातून त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान होणार नाही, यासाठी आपल्या स्थरावरून त्वरीत कार्यवाही व्हावी याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक जि . प . पुणे, मा .उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद पुणे मा . गटविकास अधिकारी पंचायत समिती वेल्हे,मा . गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वेल्हे देण्यात आले असल्याचे कांबळे यांनी सांगितले.