जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हटले नेहरू पुतळ्या समोरील होर्डिंग्ज ; काँग्रेसच्या आंदोलनाला यश


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हटले नेहरू पुतळ्या समोरील होर्डिंग्ज ; काँग्रेसच्या आंदोलनाला यश

नगर :(प्रतिनिधी संजय सावंत) लालटाकी येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर उभारण्यात आलेले सर्व होर्डिंग्ज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानंतर हटविण्यात आले. या मागणीसाठी काँग्रेसने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात आंदोलन उभे केले होते.

३१ डिसेंबरला विद्यार्थी काँग्रेसने या मागणीबाबत मनपा उपायुक्तांना निवेदन दिले होते. त्यावर कारवाई न झाल्यामुळे ७ जानेवारीला  मनपामध्ये झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष काळे यांनी जिजाऊ जयंती दिनी १२ जानेवारीला बुलडोजरने होर्डिंग्ज हटविण्याची घोषणा केली होती. पुतळ्याचे पावित्र्य राखत पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची देखील मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या या आक्रमक घोषणेमुळे शहरात तणाव निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यापूर्वीच जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातल्यामुळे मनपाने कारवाई करत सर्व होर्डिंग्ज उतरवले. त्याचबरोबर नेहरू पुतळा परिसराला लागून असणारी अतिक्रमणे देखील हटविली. सोमवार सकाळपासून मनपाच्या साफ सफाई कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छतेसाठी धावाधाव केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला 

खलील सय्यद, मनोज गुंदेचा, नलिनीताई गायकवाड, अनंतराव गारदे, फारुखभाई शेख, अनिसभाई चुडीवाल, नाथा अल्हाट, निजामभाई जहागीरदार, चिरंजीव गाढवे, ॲड.अक्षय कुलट, नीता बर्वे, कौसर खान, प्रमोद अबुज, अमित भांड, प्रवीण गीते,  सिद्धेश्वर झेंडे, सुजित जगताप, अज्जूभाई शेख, प्रसाद शिंदे, प्रशांत वाघ, शरीफ सय्यद, मुबीन शेख, वाजिद शेख, ॲड.चेतन रोहोकले आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


जिल्हाधिकार्‍यांनी बोलवली विशेष बैठक 


काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष लांडगे, उपायुक्त पैठणकर, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे, नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचे पदाधिकारी डॉ. सईद काझी, युनूसभाई तांबटकर उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 

बैठकीपूर्वीच मनपाची कारवाई, बैठकीत काय होते, काँग्रेस काय भूमिका घेते याबाबत चर्चेला उधाण आले होते. परंतु बैठक पार पडण्यापूर्वीच मनपाच्या वतीने कारवाई करत नेहरू पुतळ्याचा श्वास मोकळा करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा नेहरू पुतळा, परिसरातील विस्तीर्ण झाडे दिसू लागली आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा काँग्रेसकडून सत्कार जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत बैठकीतच शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पंडित नेहरू यांनी भुईकोट किल्ल्यामध्ये वास्तव्यास असताना लिहिलेल्या डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक भेट देऊन सत्कार करत जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाचे आभार मानले. ट्रस्टने सामंजस्याची भूमिका घेत सहकार्य केल्याबद्दल त्यांचे देखील काँग्रेसने आभार मानले.

प्रभारी आयुक्त पदाचा चार्ज जिल्हाधिकाऱ्यांकडेच पुढील तीन वर्षांसाठी राहावा - काळे 

यावेळी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ.भोसले यांचे आभार मानताना किरण काळे म्हणाले की, अनेक वर्षानंतर  डॉ.राजेंद्र भोसले यांच्या रूपाने नगर मनपाला अत्यंत कार्यक्षम आयुक्त लाभले आहेत. त्यांची धडाकेबाज निर्णय घेण्याची पद्धत पाहता नगर शहराच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडेचप्रभारी आयुक्तपदाचा चार्ज पुढील तीन वर्षांसाठी राहावा अशी भावना व्यक्त केली.  

१. काँगेसच्या आक्रमक भूमिकेनंतर नेहरू पुतळ्यासमोरील होर्डिंग्ज आणि अतिक्रमणे हटविल्यामुळे पुतळा आणि परिसरातील झाडे दिसू लागली आहेत.

२. जिल्हाधिकारी दालनामध्ये नेहरू पुतळ्या बाबत सोमवारी बैठक पार पडली.

३. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पंडित नेहरू यांनी भुईकोट किल्ल्यामध्ये वास्तव्यास असताना लिहिलेले डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक भेट देऊन जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते सत्कार करत पक्षाच्यावतीने आभार मानण्यात आले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News