पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करा !! कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन ॥


पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करा !! कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन ॥

कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल-डीझेल दरवाढ कमी करावी अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी.

संजय भारतीकोपरगाव प्रतिनिधी .

         मागील काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पेट्रोल डीझेल दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. कोरोना संकटातून कसाबसा आपला जीव वाचावा यासाठी मागील काही महिन्यांपासून नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून घराबाहेर पडले नाही. मात्र काही जून महिन्यापासून अनलॉक सुरु झाल्यापासून हळूहळू सर्व छोटे-मोठे व्यवसाय सुरु होत असतांना वाढलेल्या पेट्रोल-डीझेल दरवाढीमुळे विपरीत परिणाम होवून या व्यावसायिकांचे तसेच शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे. त्यासाठी करण्यात आलेली पेट्रोल-डीझेल दरवाढ कमी करून सर्व समान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल-डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करून दिलेल्या निवेदनात कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

                     सदरचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनी स्वीकारले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, विठ्ठलराव आसने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शहर कार्याध्यक्ष संतोष चवंडके, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, जिल्हा संघटक देवेन रोहमारे, अॅड.मनोज कडू, कृष्णा आढाव, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.       

जाहिरात
Search
विडिओ
Recent News