ब्रेकिंग: "बर्ड फ्लू"ने परभणीत 800 कोंबड्यांचा मृत्यू !


ब्रेकिंग: "बर्ड फ्लू"ने परभणीत 800 कोंबड्यांचा मृत्यू !

न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात मुरूंबा येथे 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू "बर्ड फ्लू" मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुंगळीकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

हाती आली धक्कादायक माहीती-

देशातील 6 राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेलं असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी पोल्ट्री फॉर्ममध्ये पोल्ट्री फॉर्ममध्ये 8000 हजार कोंबड्या असून, त्यापैकी 800 कोंबड्या मरण पावल्या आहेत.

कोंबड्या मरण पावल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं. 

मुरूंबा परिसरातील 1 किमी अंतरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले असून, 10 किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, आता नगर जिल्ह्य़ातील 3 हजार 321 कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "बर्ड फ्लू"च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुपारी 3 वाजता बैठक बोलावली आहे. कृषी विषयक संसदीय स्थायी समितीने पशुसंवर्धन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देशात पशु लसांची उपलब्धता तपासण्यासाठी बोलावले आहे.  


जाहिरात
Search
विडिओ
Recent News