"एनडीआरएफ"ला लवकरच जागतिक मानांकन मिळणार..?


"एनडीआरएफ"ला लवकरच जागतिक मानांकन मिळणार..?

न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला (एनडीआरएफ) या वर्षाच्या अखेरीपर्यंत जागतिक मानांकन मिळण्याची शक्यता असल्याने भारत हा लवकरच संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय बचाव मोहिमांचा हिस्सा बनू शकतो, असे "एनडीआरएफ" चे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले. 

 इन्सारॅग संस्थेतर्फे मानांकन-

भारतात ज्याप्रमाणे मानांकन पद्धत आहे, त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या "इन्सारॅग" मार्फत जगभरातील आपत्ती निवारण पथकांना मानांकन दिले जाते. हे आंतरराष्ट्रीय मानांकन असते.  हे आंतरराष्ट्रीय मानांकन "इन्सारॅग"या संस्थेतर्फे केले जाते. स्वित्झर्लंड येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेचे 90 हून अधिक देश आणि संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये जाळे असून ते जगभरात शोध आणि बचाव मोहिमा राबवितात. हे मानांकन मिळविण्याच्या आम्ही फारच जवळच असून कदाचित या वर्षी ते मिळेल, अशी आशा आहे, असे प्रधान म्हणाले. हे मानांकन चीन आणि पाकिस्तानमधील संस्थांनाही मिळाले आहे.  "एनडीआरएफ"ने याआधीही इतर देशांमधील बचाव मोहिमांमध्ये भाग घेतला होता. नेपाळ आणि जपानमध्ये या दलाने कार्य केले आहे. मात्र, ही त्या देशांनी वैयक्तिकरित्या केलेली विनंती होती. "यूएन"चे मानांकन मिळाल्यास ‘एनडीआरएफ’चे नाव बचाव पथकांच्या जागतिक यादीत येणार आहे.

"इन्सारॅग"च्या समितीने सप्टेंबर 2019 मध्ये "एनडीआरएफ" च्या कार्याचा प्राथमिक आढावा घेतला आहे. कोरोना परिस्थितीमुळे या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. मात्र, 2021 या वर्षांत "एनडीआरएफ" च्या दोन मोठ्या पथकांना मानांकन मिळेल, अशी आशा प्रधान यांनी व्यक्त केली.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News