कुरकुंभ एम .आय .डी .सी. मधील हार्मोनि कंपनीमध्ये युवकाचा शॉक लागून मृत्यू


कुरकुंभ एम .आय .डी .सी. मधील हार्मोनि कंपनीमध्ये युवकाचा शॉक लागून मृत्यू

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

 कुरकुंभ एम.आय.डी.सी.मधील हार्मोनि कंपनीमध्ये युवकाचा शॉक लागून मृत्यू.कुरकुंभऔद्योगिक वसाहतीमध्ये वेळोवेळी अश्या घटना होताना दिसत आहे. कंपनीमधील काम करणाऱ्या युवकांना कोणत्याही प्रकारची सेफ्टी न देता अश्या घटना घडत आहेत प्रायव्हेट मध्ये काम करणाऱ्या लेबर लोकांना मात्र कॉन्ट्रॅक्टरच्या या हलगर्जीपनाचा सामना करावा लागत आहे तुषार पाळेकर असे त्या मृत्यू पडलेल्या युवकाचे नाव आहे.

निखील शंकर टेळे वय २५ वर्षे व्यवसाय नौकरी मूळ त्रिमूर्ती प्लॉट न ८ सेकटन ९ कामोटे नवी मुंबई पनवेल समक्ष दौंड पोलीस स्टेशनमध्ये राहून जबाब दिला आहे. हार्मोनि ट्रेनिंग सेप्टि ऑफिसर म्हणून काम करीत असून कंपनीचे काम कुरकुंभ येथे चालू आहे सध्या कंपनीने फोर व्हीलर पार्किंग बनविण्याचे काम घेतले आहे सदरचे काम दिनांक ०८/०१/२०२१ सुरू झालेले आहे सदर काम श्रीकांत जाधव यांनी घेतले असून त्यांनी उमेश जगदाळे यांना दिलेले आहे व त्यांची सदरची कामे त्यांची लोक करून घेत आहेत.तारीख ९/१/२०२१ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास कंपनीचे काम चालू झाले त्यावेळी 

मंदार दिलीप पवळ रा कोकणे वस्ती नदांदेवी,दौंड जिल्हा पुणे याने काम त्यावेळी सुरू केले होते त्यावेळी येताना तुषार विजय पाळेकर वय १९ वर्षे रा.नदादेवी, कोकणे वस्ती तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी ८/१/२०२१ रोजी पासून कामास आणले होते,त्यास सिमेंट काँक्रीटचा माल ओढून लेवल करणे असे काम होते.दुपारी १:३० वा पर्यंत काम चालू होते मंदार दिलीप पवळ हे काँक्रीट चे लेवल करण्याचे मशीनवर काम करीत होते.व त्यांनी १:३० वाजण्याच्या सुमारास मशीन बंद करून जेवणाचा डब्बा आणण्यासाठी गेले होते.व त्यावेळी तुषार पाळेकर हा कामाच्या ठिकाणी होता व काही लोक त्यांना दिलेले काम करीत होते त्याच वेळी तुषार विजय पाळेकर याने फ्लोटर मशीन अचानक चालू करून तुषार त्यावर कंट्रोल करीत होता त्यावेळी मशीनची वायर मशीनचे ब्लेडला गुंडाळली गेली व मशीन चालू बंद करण्याचे स्विचपासून वायर शॉर्ट होऊन आलेला करंट मशिनला लागून त्याचे हाताला शोक बसला त्यामुळे तो मशीन भोवती हँडला पकडलेले हात जोरात व्हायब्रेशन होऊन त्याचा तोल मागे जाऊ लागल्याने तेथील गार्ड व इतर लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी मशीनचा करंट बंद केला त्यावेळी तो काँक्रीटवर पडला तेथील लोकांनी त्यास तेथे असणाऱ्या गाडीतून दुपारी २:०० वा. चे सुमारास दौंड पिरॅमिड हॉस्पिटल येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून त्याचे औषध उपचार चालू केले व त्या दरम्यान तो मयत झालेले कळविण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News