हेल्थ टिप्स: पनीरचं अतिसेवन "या" लोकांना ठरू शकतं घातक !


हेल्थ टिप्स: पनीरचं अतिसेवन "या" लोकांना ठरू शकतं घातक !

पनीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. परंतु याचा अर्थ असा नाही की, त्याचे जास्त सेवन केले पाहिजे. पनीरचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. 

कसं असावं पनीरचं आपल्या आहारात प्रमाण..?

◾जर आपल्याला आपले हृदय तंदुरुस्त ठेवायचे असेल आणि कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करायचे असेल तर पनीरचे सेवन कमी करा. 

◾ पनीरचे जास्त सेवन केल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते, सोबतच हृदयरोग होऊ शकतो.

◾पनीरमध्ये मीठ असल्यामुळे त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. परिणामी पनीर जास्त प्रमाणात घेतल्यास उच्च रक्तदाब होऊ शकतो. 

◾ज्यांना उच्च रक्तदाब समस्या आहे त्यांनी पनीर खाणे टाळावे.

◾ ज्यांना ॲसिडीटीचा त्रास आहे, त्यांनी कमीतकमी पनीर खावे. खायचे असेल तर ते रात्री खाऊ नये. अन्यथा, आम्लपित्त आणि पोटामध्ये गडबड होण्याची समस्या होऊ शकते.

◾पनीर प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. परंतु, शरीरात जास्त प्रमाणात प्रोटीनमुळे अतिसार होऊ शकतो.

◾ कच्चं पनीर खाणे देखील बर्‍याच लोकांना आवडते. परंतु, ही चांगली सवय नाही. वास्तविक, कच्चा पनीर खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो.

(डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच आपण आपल्या आहारातील हानिकारक घटकांचे प्रमाण ठरवावे, सदर माहिती केवळ प्राथमिक स्वरूपाची समजावी)


जाहिरात
Search
विडिओ
Recent News