ऑस्ट्रेलियाकडून माफीनामा जाहीर, वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल प्रेक्षकांवर कारवाई


ऑस्ट्रेलियाकडून माफीनामा जाहीर, वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल प्रेक्षकांवर कारवाई

न्यूज नेटवर्क🔍

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सिडनी येथील कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूविरूद्ध केलेल्या वर्णद्वेषी टिप्पणी केली. 

वर्णद्वेषाचं प्रकरण असं..

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला चहापानाच्या ठीक अगोदर बाऊंड्री लाइनवर वर्णद्वेषी टीका सहन करावी लागली. या प्रकरणाची माहिती सिराजने कर्णधार अजिंक्य रहाणेला दिली. त्यानंतर रहाणेने तातडीने पंचांकडे याबाबत तक्रार केली. चहापान वेळेपूर्वी या संपूर्ण प्रकारामुळे खेळ थोडा वेळ थांबला होता. याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 6 प्रेक्षकांना मैदानाबाहेर पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत.सामन्याच्या तिसर्‍या दिवशीही काही दर्शकांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याविरोधात वर्णद्वेषी भाष्य केले होते. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाने या प्रकरणी अम्पायर व मॅच रेफरीकडे तक्रार केली.

         क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या माफिनाम्यात म्हटलं की,टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल प्रेक्षकांनी केलेल्या वर्णभेदी टिपण्णीचा सीए निषेध करते. कोणाच्याही वर्णावरून टीका करण्याच्या वृत्तीच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत. आमचे संबंधित अधिकारी तपास करत आहेत. अहवाल आला की दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. भारतीय खेळाडूंच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तेथील प्रेक्षकांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तेथून उठवण्यात आलं. घडलेल्या प्रकारात अजिंक्य रहाणे आणि भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा आहे, असं दिसून आलं.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News