तमसभज्ञाक, भ्रष्ट व अनागोंदी माजविणार्‍यांना जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी स्वयंसेवी संघटनांच्या वतीने लोक चित्रगुप्तची नियुक्ती जयंत येलुलकर व सुहास मुळे ठरले शहरातील पहिले लोक चित्रगुप्त


तमसभज्ञाक, भ्रष्ट व अनागोंदी माजविणार्‍यांना जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी  स्वयंसेवी संघटनांच्या वतीने लोक चित्रगुप्तची नियुक्ती  जयंत येलुलकर व सुहास मुळे ठरले शहरातील पहिले लोक चित्रगुप्त

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - समाजातील तमसभज्ञाक, भ्रष्ट व अनागोंदी माजविणार्‍यांना जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने लोक चित्रगुप्तची नियुक्ती करण्यात आली. शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत योगदान देणारे जयंत येलुलकर व सुहास मुळे यांची संघटनांच्या वतीने लोक चित्रगुप्त म्हणून निवड करण्यात आली.हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित जयंत येलुलकर लोक चित्रगुप्तचा सन्मान प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड.कारभारी गवळी, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, फरिदा शेख, अंबिका जाधव, लतिका पाडळे, पोपट भोसले, सखूबाई बोरगे, शशीकला गायकवाड आदी उपस्थित होते. 

देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली. लोकशाहीतील निवडणुकांमध्ये धनदांडगे उमेदवार मतदारांना पैसे देऊन आणि जातीचा वापर करून मागच्या दाराने निवडून येतात. तर पुढील पाच वर्षामध्ये जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम करतात. याच कारणामुळे शहरात सर्व रस्ते उखडलेले आहेत, पाण्याच्या टाक्या बांधून अनेक वर्षे झाले तरीही नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. सर्वच भागात नागरी सुविधेचा बोजवारा उडाला आहे. महापालिकेचे अधिकारी अतिक्रमण करणार्‍यांनी संरक्षण देतात. प्रश्‍न घेऊन येणार्‍या नागरिकांची दखल घेतली जात नाही. एकंदरीत रामभरोसे व अनागोंदी कारभार शहरात सुरू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.लोकशाहीतील तमसभज्ञाक तंत्राचा वापर करणार्‍यांना सत्तेतून पायऊतार केला पाहिजे. त्याच वेळेला सत्वभज्ञाक लोकांना निवडून दिले पाहिजे. समाजातील अशा तमसभज्ञाक लोकांचा शोध घेऊन, त्यांचा जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी लोक चित्रगुप्त या पदाची निर्मिती संघटनेने केली आहे. जयंत येलुलकर आणि सुहास मुळे यांना शहराचे पहिले लोक चित्रगुप्त म्हणून संघटनांनी निवड केली आहे. ते तमसभज्ञाक व भ्रष्ट लोकांना जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

तमसभज्ञाक, भ्रष्ट व अनागोंदी माजविणार्‍यांमुळे समाजाचे मोठे नुकसान झाले. गोर-गरीब जनतेची लूट सुरु आहे. विकासाला चालना देऊन, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी तमसभज्ञाक लोकप्रतिनिधी व लोकांना उघडे करण्याची गरज आहे. बायोलॉजिकल बिलीफ इनरिचमेंट तंत्राने लोकांमध्ये असणारी तमसचेतना दूर करता येते आणि त्यांच्या ठिकाणी सत्वचेतना स्थापित करता येते. लोकजागृती व लोकसहभागाने भ्रष्ट, तसमभज्ञाकवृत्ती दूर होऊन चांगले दिवस येऊ शकणार असल्याची भावना अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News