वीज कंत्राटी कामगारांना कमी न करण्याचे औद्योगिक न्यायालयाचे आदेश


वीज कंत्राटी कामगारांना कमी न करण्याचे औद्योगिक न्यायालयाचे आदेश

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

महावितरण कंपनीतील रिक्तपदांवर वर्षानुवर्षे काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना कायम करावे या मागणी साठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची केस मुंबई बांद्रा कोर्टात चालु होती. महावितरण कंपनीतील भरती झाल्या नंतर या  कामगारांना कामावरून कमी करू नये या करिता संघटनेने  मा . कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई येथे दाद मागितली होती.  या मध्ये कामगार उपायुक्त तथा समेट अधिकारी श्री रविराज ईळवे यांच्या कडे सुनवणी होवुन सदरचा विषयावर निर्णय करण्या करिता मा औद्योगिक न्यायालय मुंबई येथे वर्ग करण्यात आला . या बाबतीत संघटनेने या कामगारांना नोकरीत संरक्षण करिता मा औद्योगिक न्यायालयात अंतरिम आदेश करिता अर्ज दाखल केला. या बाबतीत सुनावणी होवुन. या केस मधील कामगारांना औद्योगिक न्यायालयात चालू असलेल्या केस चा अंतिम निकाल लागत नाही तो पर्यंत कामगारांची जैस थे स्थिति ठेवावी असा अंतरिम आदेश दिलेला आहे.  या बाबतीत मा अप्पर कामगार आयुक्त मुंबई यांनी दि ७/१२/२०२० रोजी अॅवाॅर्ड प्रसिद्ध केले आहे.  

 बांद्रा औद्योगिक न्यायालयाकडे संघटनेने दाद मागितली असता त्यानुसार आता राज्यातील एकूण १८९६ कामगारांना केस चा अंतिम निकाल लागे  कामावरून कमी करू नये अशा प्रकारचे अंतरिम आदेश १६ सप्टेंबर २०२० रोजी मुंबई येथील बांद्रा औद्योगिक न्यायालयातील माननीय न्यायमूर्ती आर.एन.आंबटकर यांच्या कोर्टाने दिले होते.नुकतीच या आदेशाची प्रत संघटनेला प्राप्त झाली असून या निर्णया मुळे राज्यातील कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून  मा .न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे आता महावितरण कंपनी प्रशासनाला क्रम प्राप्त आहे.

मुंबईतील सुप्रसिद्ध कायदे तज्ञ माननीय अॅड  श्री.विजय पांडुरंग वैद्य यांनी संघटनेच्या वतीने बाजू मांडली या केस साठी मा.अण्णाजी देसाई, मा.सुभाष सावजी, मा. शरद संत, निलेश खरात, सचिन मेंगाळे, उमेश आणेराव, राहुल बोडके, सागर पवार, रोहित कोळवनकर व अन्य अनेक पडद्यामागील अज्ञात कामगारांचे संघटनेला वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News