वासुंदे येथील नियमबाह्य बेकायदेशीर खाणउद्योग व क्रशरवरती कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन....


वासुंदे येथील नियमबाह्य बेकायदेशीर खाणउद्योग व क्रशरवरती कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन....

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी...

दौंड तालुक्यातील वासुंदे, हिंगणीगाडा, जिरेगाव, पांढरेवाडी, येथील नियमबाह्य बेकायदेशीर पणे सुरु असलेल्या सर्व क्रशरवरती कारवाई करण्याबाबतचे निवेदन पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी व वासुंदे येथील शेतकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना नुकतेच देण्यात आले आहे...

नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले खाण उद्योगांमधून शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे... बोअर ब्लासटिंग मुळे पाणी पातळीत कमालीची घट होत असून पिण्याच्या पाण्याचे स्रोत बंद पडत आहेत...

भुकंपासमाण होणारे बोअर ब्लासटिंग येथील जिवितास हाणी पोहोचवणारे आहे, याच बोअर ब्लासटिंग मुळे येथील वन्यजीव, पशुपक्षी, भुचर, यांचे अस्तित्व संपुष्टात येवू लागले आहे...

रात्री अपरात्री सुरू असलेले क्रशर मोठ्या प्रमाणात हवेचे व ध्वनी प्रदुषण करत आहेत मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व खनिकर्म विभाग बघ्याची भुमिका घेत असुन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे कुपंनच शेत खात असल्याचे बोलले जात आहे...

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कारवाई केली नाही तर आगामी काळात शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात उतरुन येथील शेतकऱ्यां समवेत तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीच्यावतीने माध्यमांना सांगण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News