बारामती : प्रतिनीधी
सदोबाचीवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुकीमध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे महत्वाची बाब म्हणजे तीनही गट राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत.
होळ गावातून विभाजित झाल्यापासून यंदाची ही सदोबाचीवाडी ग्रामपंचायतीची तिसरी निवडणूक आहे. नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी तीन प्रभागांमधून २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पैनल प्रमुख संजय होळकर (सर), प्रविण सुर्यवंशी, हर्षद होळकर या तरुणांनी गावच्या विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊन श्री.ढगाईदेवी परिवर्तन पैनल तयार केला आहे. त्यांनी दोन प्रभागांमधून निवडणूक लढवण्याचे नियोजन केले आहे. तसेच सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक आनंदकुमार होळकर, माजी सरपंच मनीषा होळकर यांनी सोमेश्वर ग्रामविकास पैनलच्या माध्यमातून नऊ उमेदवार उभे केले आहेत.तसेच माजी सरपंच विलास होळकर यांनी "म्हस्कोबानाथ ग्रामविकास पैनल" तयार केला असुन नऊ जागी उमेदवार उभे केले आहेत. एकंदरीतच सर्वांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून निवडणूकीमध्ये अटीतटीची लढत पाहण्यास मिळनार आहे.