श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन !!


श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कुटुंबातील थोर व्यक्ती, गुरुजन यांचा आदरकरतांना सार्वजनिक जीवनात कायद्याचा आदर करणे शिकावे.असे समुपदेशन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक बोरसे यांनी केले.

अहमदनगर पोलिस दलाचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, यांचे मार्गदर्शनाखाली  कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे पुढाकारातून कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे हद्दीत पोलिस दल स्थापना दिवस साजरा केला जात असून त्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन शहर पोलिस स्टेशन येथे करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून स.पो.नि.दिपक बोरसे बोलत होते.ते पुढे म्हणाले,कायदा हा सर्व श्रेष्ठ आहे.आपणास कर्तव्याची जाणीव करून देतांना मुलभूत हक्कही मिळवून देतो. तारुण्याकडे वाटचाल करतांना अनेक प्रसंगी समाजातील अविचारी लोकांचे त्यांचे राहणीमान किंवा अनैतिक धाडसाचे आकर्षण वाटू लागते.अशा वेळी आपण हे व्यक्तीमत्व योग्य-अयोग्य पडताळून पहावे.यातून एखादे चुकीचे कृत्य आपल्या हातून घडण्याची शक्यता असते.अशातून आपले उर्वरित आयुष्यात सरकारी अथवा इतर नोकरीत चारित्र्य पडताळणीतून अडथळा निर्माण होवून आयुष्याचे नुकसान होते.असे सांगत पोलिस दलाची रचना, कार्यपध्दती, कायदा व सुव्यवस्था राखतांना प्रसंगानुरूप हाताळण्यात येणारी शस्रे,विविध दालनांची माहिती,कोरोना संक्रमण रोखतांना घ्यावयाची काळजी, वाहतूक सुरक्षा या संदर्भात माहिती दिली.

कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे शैलेंद्र ससाने,सचिन शेवाळे गणेश मैद,प्रकाश कुंढारे,विजया दिवे,प्रीती बनकर,सुवर्ण कानवडे यांचे सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.तर श्री.गो.विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोर्हाळकर, जेष्ठ शिक्षक दिलीप तुपसैदर,उपमुख्याध्यापक रवींद्र पाटील, पर्यवेक्षक रमेश गायकवाड,सुरेश गोरे,अतुल कोताडे,एकनाथ जाधव, विजय आव्हाड, रघुनाथ लकारे यांचे सह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक सुशांत घोडके यांनी तर आभार गोपनीय शाखेचे राम खारतोडे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News