पोलीस प्रशासनाने दरोडेखोरांचा तातडीने तपास लावुन त्या ज्येष्ठ महिलेला न्याय मिळवुन द्यावा - सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांची जिल्हा पोलीस प्रशासनाकडे मागणी


पोलीस प्रशासनाने दरोडेखोरांचा तातडीने तपास लावुन त्या ज्येष्ठ महिलेला न्याय मिळवुन द्यावा - सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांची जिल्हा पोलीस प्रशासनाकडे मागणी

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव - कोपरगांव तालुक्यातील ओगदी गावातील लक्ष्मण तुकाराम जोरवर हे शेतात पाणी भरण्यास शेतात गेले असता त्यांची धर्मपत्नी कमलबाई ह्या एकट्याच घरी असतांना मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसुन दरोडेखोरांनी ज्येष्ठ महिलेला गंभीर मारहाण करुन लाखो रुपये लंपास केल्याची घटना ही मनसुन्न करण्याची सारखी असल्याने पोलीस प्रशासनाने तातडीने दरोडेखोरांचा तपास लावुन त्या ज्येष्ठ महिलेला न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे केली.      

सध्या महाराष्ट्रात महिलांना मारहाण अत्याचारा बाबत होणा-या घटना हया निदंनीय आहे. दरोडेखोर आणि भुरटे चोरटयांनी सध्या सगळीकडेच धुमाकुळ घालुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करुन भितीचे वातावरण निर्माण केले जात असुन पोलीस प्रशानाने गाफील राहु नये. घरफोडी, चेन, स्नॅचिंग, विद्युत मोटारी, वाहनचोरी, चंदन तस्करी यासारखे अनेक प्रकार अनलाॅक नंतर चोरटयांची नागरिकांमध्ये प्रचंड दहशत वाढविल्यामुळे पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. शेती पंपाचे विजेची वेळ ही रात्रीची असल्याने शेतकरी कुटूंबातील बरेचसे पुरुष हे पाणी भरण्यासाठी शेतात जात असल्याचे हेरून दरोडेखोर घरात प्रवेश करत घरातील आबाल वृद्ध, लहान बालके, महिला यांना मारहाण छळ करत चोरी करून पळून जातात या घटनेला पायबंद घालण्यासाठी शेतक-यांना शेतीच्या कामासाठी दिवसाचा वीज पुरवठा केला तर नक्कीच या गोष्टीला काही प्रमाणात आळा बसू शकत असल्याचे सौ. कोल्हे म्हणाले.

घटनेची माहिती मिळताच ओगदी गावातील नागरिकांनी जोरवर वस्तीकडे धाव घेतली ती महिला जखमी अवस्थेत दिसताच. रविंद्र पोळ, विष्णुपंत कोल्हे यांनी तातडीने औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांना घटनेची माहिती दिली व कोल्हे यांनी रुग्णवाहिका पाठवून जखमी कमलबाई यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास मोठी मदत केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News