दौंड शुगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा,सर्वोत्कृष्ट पर्यावरण सनवर्धन पुरस्कार जाहीर


दौंड शुगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा,सर्वोत्कृष्ट पर्यावरण सनवर्धन पुरस्कार जाहीर

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

वसंतदादा शुगर इन्स्टिस्ट्यूटच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार यावर्षी आपल्या दौंड तालुक्यातील दौंड शुगरला जाहीर झाला आहे.तसेच उत्कृष्ट चीफ केमिस्ट हा पुरस्कार आपल्या कारखान्याचे चीफ केमिस्ट श्री.शशिकांत गिरीमकर यांना जाहीर झाला.

 या निमित्ताने सर्व शेतकरी बांधव,सर्व  पदाधिकारी तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांचे  मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानण्यात आले,देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिस्ट्यूटच्या ४४ व्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री श्री.उध्दवजी ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील  यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा दौंड शुगर कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी सर्व शेतकरी बांधव,पदाधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग या सर्वांचे अभिनंदन व आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News