रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर धन्वंतरी हॉस्पीटलमध्ये पार पडले.


रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर  धन्वंतरी हॉस्पीटलमध्ये पार पडले.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण: 

 विविध घटना, कार्यक्रम व समाजातील घडामोडींचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना धावपळ करावी लागते.  गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात आरोग्याचे महत्व अधोरेखित झाल्याने पत्रकांरासह सर्वांनीच आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा यांनी केले.

पत्रकार दिनानिमीत्त रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर शनिवारी ( दि. ९ ) धन्वंतरी हॉस्पीटलमध्ये पार पडले. या वेळी  रोटरीच्या वतीने गुलाबपुष्प देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. रोटरीचे अध्यक्ष प्रा.किसनराव माने, सचिव बाळासाहेब चौधरी, खजिनदार डॉ. पुरूषोत्तम बिहाणी, डॉ. गणेश चेके, प्रा. अण्णासाहेब दिघे, डॉ मयूर लांडे आदी उपस्थित होते.

या वेळी पत्रकारांची मधुमेह, रक्तदाब, इसीजी तपासणी करण्या येऊन वैद्यकीय सल्ला देण्यात आला. उद्या रविवारी व सोमवारी या दोन दिवसांत डोळे, दात व इतर आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. रोटरी क्लबमध्ये डॉक्टरांची संख्या अधिक आहे. पत्रकारांच्या आरोग्य चांगले राहण्यासाठी  रोटरीचे डॉक्टर्स नेहमी सहकार्य करतील, असे रोटरीचे अध्यक्ष प्रा.किसनराव माने यांनी सांगीतले.

रोटरीने पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी हा चांगला उपक्रम राबविला, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य नीलकंठ कराड यांनी काढले. 

या वेळी तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

जाहिरात
Search
विडिओ
Recent News