उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना योगी नाव लावण्याचा नैतिक अधिकार नाही..वैशाली काळभोर,अंगणवाडी सेविकेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा थाळीनाद करून निषेध


उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना योगी नाव लावण्याचा नैतिक अधिकार नाही..वैशाली काळभोर,अंगणवाडी सेविकेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा थाळीनाद करून  निषेध

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पिंपरी (दि. 9 जानेवारी 2021) देशात महिलांवर होणा-या अन्याय, अत्याचारांच्या एकूण घटनेतील पंधरा टक्के घटना ह्या उत्तर प्रदेशमध्ये होत आहेत. हे पाहता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिष्ट यांनी योगी नाव लावण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे. अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी केली.

     उत्तर प्रदेशमध्ये बदायु जिल्ह्यात पन्नास वर्षिय आंगणवाडी सेविकेवर नराधमांनी सामुहिक बलात्कार करुन तिची निर्घ्रृणपणे हत्या केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पिंपरी चिंचवड महिला कॉंग्रेसने शनिवारी (दि.9 जानेवारी) चिंचवड पोस्ट ऑफीस समोर थाळीनाद आंदोलन केले.

       या आंदोलनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या नावे निषेधाचे पत्र चिंचवड पोस्टात देण्यात आले. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, भोसरी विधानसभा महिला अध्यक्षा मनिषा गटकळ तसेच संगिता कोकणे, निर्मला माने, सुप्रिया भिंगारे, सविता धुमाळ, स्वप्नाली आसोले, पौर्णिमा पालेकर, पल्लवी पांढरे, मंगल ढगे, विजया काटे, कविता आल्हाट, संगिता आहेर आदींनी सहभाग घेतला.

      यावेळी वैशाली काळभोर म्हणाल्या की, हि निंदणीय घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेश महिला आयोगाने जी प्रतिक्रिया व्यक्त केली. ती महिला भगिनींच्या स्वातंत्र्यावर बंधने आणणारी आहे. अत्याचा-यांना त्यामुळे पाठबळ मिळेल. महिलांचे संरक्षण करणे हे प्रत्येक राज्य सरकारचे कर्तव्य आहे. राज्य महिला आयोगाला न्यायालयाचे अधिकार असतात. अत्याचारीत महिलांना न्याय मिळवून देणे हि महिला आयोगाची जबाबदारी आहे. परंतू पिडीत महिलेवरच टिपणी करणा-या उत्तर प्रदेश महिला आयोगाचा देखील आम्ही निषेध करतो. "दिशा"सारखा कडक कायदा उत्तर प्रदेश सरकारने करुन त्याची कडक अंमलबजावणी करावी अशीही मागणी करतो. "योगी" या शब्दाचा अर्थ ज्ञानी, तपस्वी असा आहे. परंतू उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर वाढणारे अत्याचारांचे प्रमाण पाहता मुख्यमंत्री अजय बिष्ट यांनी ‘योगी’ हे नाव येथून पुढे लाऊ नये अशीही मागणी वैशाली काळभोर यांनी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News